Superstition in Wardha: नागसेननगरात नरबळीचा प्रयत्न फसला! विहिरीला शेंदूर लावत चिमुकल्याला ढकलले विहिरीत

चंद्रावर पोहोचलेल्या देशात आजही अंधश्रद्धा कायम असल्याचे वर्धेत उघड झाले. येथील नालवाडी परिसरातील नागसेननगरात एका महिलेने चिमुकल्याला पूजा करून विहिरीत ढकलून नरबळी देण्याचा प्रयत्न केला.
Superstition in Wardha: नागसेननगरात नरबळीचा प्रयत्न फसला! विहिरीला शेंदूर लावत चिमुकल्याला ढकलले विहिरीत

Vardha Superstition Failed Attempt : चंद्रावर पोहोचलेल्या देशात आजही अंधश्रद्धा कायम असल्याचे वर्धेत उघड झाले. येथील नालवाडी परिसरातील नागसेननगरात एका महिलेने चिमुकल्याला पूजा करून विहिरीत ढकलून नरबळी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलगा दोरीच्या सहायाने वर आल्याने तिचा प्रयत्न फसला. या प्रकरणी शहर पोलिसांनी नरबळी, इतर अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियमान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.


मुलाला विहिरीत ढकण्याल्यापूर्वी विहिरीला शेंदूर लावत इतर प्रक्रिया करण्याचे त्या १२ वर्षीय मुलाला सांगितले. हा प्रकार करणारी महिला सध्या फरार असून पोलिस तिच्या मागावर आहेत. या प्रकारातील १२ वर्षीय मुलगा पतंग उडवत होता.

यावेळी सदर महिलेने काम पाहण्याच्या बहाण्याने त्याला सोबत घेत नागसेननगरमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीजवळ नेले. तेथे शेंदूर लावायला सांगितले, फूले टाकायला सांगत छोटा व नंतर मोठा दगड विहिरीत टाकायला सांगितला. मुलगा शेंदूर लावत असताना महिलेने त्याला मागाहून विहिरीत ढकलले. (Latest Marathi News)

दरम्यान, विहिरीमध्ये असलेल्या दोरीच्या सहाय्याने तो बाहेर आला.
नागसेननगरातील हा मुलगा त्याच्या आजीसोबत मागील दोन वर्षांपासून राहतो. घडलेली घटना त्याने आजीला सांगितली. त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून शहर पोलिसांनी नरबळी, इतर अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियमान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Superstition in Wardha: नागसेननगरात नरबळीचा प्रयत्न फसला! विहिरीला शेंदूर लावत चिमुकल्याला ढकलले विहिरीत
Supriya Sule: रोहित पवारांना ईडीच्या कार्यालयापर्यंत स्वतः सुप्रिया सुळेंनी दिली साथ; म्हणाल्या, 'माझा ईडीवर पूर्ण विश्वास..'

मुलाच्या आजीने तक्रारीत सांगितलेल्या घटनाक्रमावरून जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार करणारी महिला घटनेच्या दिवसापासून फरार आहे. त्यामुळे हे कृत्य करण्यामागचा तिचा उद्देश समजला नाही. तिच्या शोधात पोलिस पथक रवाना झाले आहे- धनाजी जळक, ठाणेदार वर्धा. (Latest Marathi News)

Superstition in Wardha: नागसेननगरात नरबळीचा प्रयत्न फसला! विहिरीला शेंदूर लावत चिमुकल्याला ढकलले विहिरीत
Anil Deshmukh: शरद पवारांना अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांवर कारवाई होतेय का? अनिल देशमुख म्हणाले...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com