लसीकरणावरून तापलं राजकारण! महापौरांवर स्वपक्षीय नगरसेवकच नाराज

लसीकरणावरून तापलं राजकारण! महापौरांवर स्वपक्षीय नगरसेवकच नाराज

नागपूर : शहरात लसीकरणाचा (Vaccination) बोजवारा उडाला असतानाच त्यावर राजकारणही तापत असल्याचे चित्र आहे. लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाला न बोलावल्यामुळे महापौरांवर त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकाने नाराजी व्यक्त केली. इतर लसीकरण केंद्रावर लसीसाठी मारामार असताना महाल रोग निदान केंद्रालाच मुबलक लस साठा कसा उपलब्ध होतो, असा सवाल करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार (Prashant Pawar) यांनी आयुक्तांना घेराव करण्याचा इशारा दिला. (Swapakshi corporator angry with mayor Nagpur news)

कोरोनाने शहरात दररोज शंभरावर बळी जात असून सत्ताधाऱ्याकडून मात्र लसीकरण केंद्राचे उदघाटन सोहळे पार पाडले जात आहे. एवढेच नव्हे फोटोसेशनही जोरावर असल्याने सामान्य नागरिक सोशल मीडियावर संताप व्यक्त करीत आहे. त्यातच आता कोरोनाच्या गंभीर काळातही लसीकरण केंद्र सुरू केल्याची माहिती न दिल्याने भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक बाल्या बोरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

लसीकरणावरून तापलं राजकारण! महापौरांवर स्वपक्षीय नगरसेवकच नाराज
अवैध दारूविक्रीवर छापा टाकायला गेले पोलिस, पण सुमारे ५०० लोकांकडून वाहनांवर तुफान दडगफेक

छापरूनगर परिसरात छापरूनगर सर्वोदय जनता हॉलमध्ये काल, गुरुवारपासून महापौर दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. परंतु या केंद्राला सुरुवात करीत असल्याची माहिती प्रभागाचे नगरसेवक बाल्या बोरकर, झोन सभापती मनीषा अतकरे, आमदार कृष्णा खोपडे यांना देण्यात आली नाही.

विशेष म्हणजे बाबूलबन परिसरातील मनपाच्या आयुर्वेदिक दवाखान्यातील लसीकरण केंद्रातील ७० टक्के कर्मचारी या नव्या लसीकरण केंद्राला उपलब्ध करून देण्यात आला. यावर नगरसेवक बाल्या बोरकर यांनी नाराजी व्यक्त केली. महापौर तिवारी यांनी त्यांना कार्यक्रमात बोलावण्याचा प्रयत्न केला, परंतु नगरसेवक बोरकर यांनी जाण्याचे टाळले. या परिसरातील तरुणांनीही महापौरांना विरोध केल्याचे समजते.

लसीकरणावरून तापलं राजकारण! महापौरांवर स्वपक्षीय नगरसेवकच नाराज
पतीचा आला ओरडण्याचा आवाज; पत्नीने येऊन पाहताच सर्वच होते संपले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जय जवान, जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनीही महाल येथील एकाच लसीकरण केंद्रासाठी मुबलक लस उपलब्ध होत असल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आयुक्तांनी लसीचा भ्रष्ट कारभार थांबवून मनपाच्या इतर लसीकरण केंद्रालाही मुबलक लस उपलब्ध करून द्यावी अन्यथा घेराव करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. महापालिका निवडणुकीत राजकीय लाभासाठी लस दडपून आमदार प्रवीण दटके यांचे वर्चस्व असलेल्या केंद्राला लस देण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आयुक्तांविरूध्द संताप

प्रशांत पवार यांनी आयुक्त निष्क्रिय असल्याच्या आरोप करीत त्यांची उचलबांगडी करावी, अशी मागणी केली. सोशल मीडियावरही अनेकांनी आयुक्तवर निष्क्रियतेचा आरोप केला असून त्यामुळेच शहरात कोरोना वाढत असल्याचे मतही नोंदविले आहे.

महालातील केंद्रावरच मेहरबानी का?

शहरातील अनेक केंद्रांवर लसीचा तुटवडा असताना महाल रोग निदान केंद्रालाच लसींचा मुबलक पुरवठा कसा होत आहे, असा करडा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी विचारला आहे. लस उपलब्ध नसल्याने पहिला डोज घेणारे परत जात आहेत तर १८ वर्षांवरील लाखो नागरिकांना अजूनही लसीच्या प्रतिक्षेत आहेत.

(Swapakshi corporator angry with mayor Nagpur news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com