नागपूर : शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह तरीही शाळा सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Positive
शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह तरीही शाळा सुरू

नागपूर : शिक्षक पॉझिटिव्ह तरीही शाळा सुरू

नागपूर : राज्यात कोरोनाच्या (Coronavirus disease) रुग्णसंख्येत वाढ झाल्याने मुंबईत पहिली ते ननवीपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, सध्या नागपूर जिल्हा आणि महापालिका (Nagpur Municipal Corporation) प्रशासनाने कुठलेही आदेश काढलेले नाही. मात्र, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत आता शाळेतील शिक्षक मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह निघत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सर्वाधिक पॉझिटिव्ह (Corona Positive) शिक्षकांची संख्या खासगी शाळेत असल्याचे दिसून येते.

हेही वाचा: औरंगाबाद : पित्याकडून पाच वर्षाच्या बालकावर वस्ताऱ्याने वार

राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्यावर गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यात आज सर्वाधिक १३३ रुग्णांचा समावेश आहे. मात्र, अद्याप शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झालेल्या वाढीमध्ये खासगी शाळेतील शिक्षकांचा संख्या अधिक आहे. शहरातील बऱ्याच खासगी शाळेतील शिक्षक पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. त्यात सीबीएसई शाळांचाही समावेश आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे सीबीएसई शाळा बंद होत्या. मात्र, कालपासून त्याही सुरू झाल्या. त्यामुळे पहिली ते आठवीचे विद्यार्थी शाळेत जात असल्याने मोठ्या संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यातूनच आता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत पालक संभ्रमात आहेत.

हेही वाचा: अकोला वीज ग्राहकांना महावितरणचा दणका

शाळांबाबत पुनर्विचार व्हावा : पालक संघटना

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शाळा सुरू झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. मात्र, ओमिक्रॉनची धास्ती आणि कोरोनाबाधितांची वाढत जाणारी संख्या यामुळे पाल्यांना शाळेत पाठविण्यावर पालक फेरविचार करीत आहेत. शाळेत पाठविण्यापेक्षा पालक ऑनलाइनला पसंती देत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून शाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुन्हा रोडावली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑफलाइन शाळेत यायचे की नाही, याचा निर्णय पालकांना घेण्यास सांगितले. काही शाळांनी पालकांकडून नव्याने संमतीपत्रे मागविली आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top