esakal | डॉक्टर नसता घरी... मोलकरीण करी चोरी!
sakal

बोलून बातमी शोधा

डॉक्टर नसता घरी... मोलकरीण करी चोरी!

डॉक्टर नसता घरी... मोलकरीण करी चोरी!

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : अनेक वर्षांपासून घरी मोलकरीण असलेल्या महिलेला डॉक्टर कुटुंबीयांनी घरातील सदस्याचा दर्जा दिला. मात्र, मोलकरणीची पैसा बघून नियत बिघडली. तिने हळूहळू घरातील पैसे चोरी करणे सुरू केले. त्यानंतर तिने थेट २ लाख ७५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरी केले. ही चोरी पोलिसांनी पकडली आणि मोलकरीणीला अटक केली. सीमा कटरे (३६, रा. मनीषनगर) असे अटक करण्यात आलेल्या मोलकरणीचे नाव आहे. (Theft-News-Nagpur-Crime-News-Fraud-with-Doctor-nad86)

नरेंद्रनगर येथील कन्फर्ट होम्स येथे राहणाऱ्या डॉ. संजयकुमार ब्रजोबंधू बारीक (३६) यांच्याकडे सीमा अनेक वर्षांपासून कामाला होती. डॉ. बारीक यांचा तिच्यावर पूर्णपणे विश्वास होता. घर सीमावर सोडले होते. घरातील पैसा बघून तिची नियत फिरली. दरम्यान, घरातील सदस्य बाहेर गेले की, हजार-पाचशे सीमा चोरायची. त्यानंतर तिला हाव सुटली. सुरुवातीला हा प्रकार डॉ. बारीक यांच्या लक्षात आला नाही. काही दिवसांपूर्वी सात हजार रुपये चोरीला गेले होते. त्यावेळी त्यांना संशय आला. परंतु, त्यांनी दुर्लक्ष केले.

हेही वाचा: सत्तांतरानंतर प्रश्न रखडला; पाच एव्हरेस्टवीर नोकरीच्या प्रतीक्षेत

सीमा कटरेच्या हातात सर्व कारभार होता. त्यामुळे घरातील दागिणे आणि पैशाबाबत माहिती होती. तिने चक्क घरातील दागिने चोरी केले. त्यामुळे घरात बोंब झाली. याप्रकरणी डॉ. बारीक यांनी बेलतरोडी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. बेलतरोडीचे ठाणेदार विजयकुमार आकोत यांनी मोलकरीण सीमा हिच्यावर संशय आहे काय? अशी विचारणा केली असता डॉक्टरांनी त्यावेळी नकार दिला.

हेही वाचा: ...अन् बघता बघता गर्दीचाच झाला सिनेमा! उसळली बघ्यांची गर्दी

असा केला भंडाफोड

सीमाने चोरी केलेले दागिने अजनीतील अके ज्वेलर्सला विकले. ‘माझे पती आजारी असून त्यांचे ऑपरेशन करायचे आहे. त्यासाठी मी दागिने विकत आहे’ असे सांगून दोन लाखांत दागिने विकले. पैसे घेऊन मस्त मौजमजा करीत होती. पोलिसांनी डॉक्टरच्या घरचे सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये सीमाची मुलगी सोबत येताना दिसली. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता तिने दागिने आईनेच चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी लगेच सीमाला अटक केली आणि २ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

(Theft-News-Nagpur-Crime-News-Fraud-with-Doctor-nad86)

loading image