
ना चाहूं सोना-चांदी... मैं तो पैसों का दिवाना रे! चोरटा जेरबंद
नागपूर : चोरट्यांमध्ये काही ना काही वेगळेपण असते. काही चोरटे हाती आलेले सर्वच काही लुटून नेतात तर काही चोरट्यांची चॉईस असते. असाच एक चोरटा सक्करदरा पोलिसांनी जेरबंद केला (Thief arrested) आहे. ‘ना चाहूं सोना-चांदी... मैं तो पैसों का दिवाना रे!’ असे तत्त्व ठेवत फक्त घरातील कॅशवर डल्ला (Just stealing money) मारत होता. सात वर्षांपासून हा चोरटा पोलिसांना गुंगारा देत होता. नंदू परदेशी आत्राम (३१, रा. सोमियानगर, राजुरा. जि. चंद्रपूर) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे.
काही महिन्यांपासून कुलरच्या डक्टीनमधून घुसून चोरी झाल्याच्या घटना उघडकीस येत होत्या. परंतु, अशा चोरीतील चोरटा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. सात वर्षांपासून नंदू आत्राम अनेक घर, दुकाने कारखाने आणि कंपन्यांमध्ये लागलेल्या मोठमोठ्या कुलरच्या डक्टीनमधून घुसत होता. आतमधील जेवढी रोख रक्कम असेल ती चोरी करीत होता. त्यानंतर तो डक्टीनच्या अवघड मार्गातून तो बाहेर पडत होता.
अशी चोरी करण्यासाठी त्याने अनेकवेळा सराव केला होता. जरीपटक्यातील दयानंद पार्क येथे राहणारे नितीन वाधवानी यांच्या सक्करदऱ्यात असलेल्या महाराजा गारमेंट्स, ॲम्बेसिडर बार ॲंड रेस्ट्रॉरेंट, वाईन पॅलेस आणि हिमालया ट्रेडर्स या दुकानांच्या कुलरच्या डक्टीनमधून नंदू घुसला आणि दुकानातील लाखो रुपयांची कॅश चोरी केली. हा चोरटा पोलिसांच्या हाती सापडत नव्हता.
अशी चोरी करण्यासाठी त्याने अनेकवेळा सराव केला होता. जरीपटक्यातील दयानंद पार्क येथे राहणारे नितीन वाधवानी यांच्या सक्करदऱ्यात असलेल्या महाराजा गारमेंट्स, ॲम्बेसिडर बार ॲंड रेस्ट्रॉरेंट, वाईन पॅलेस आणि हिमालया ट्रेडर्स या दुकानांच्या कुलरच्या डक्टीनमधून नंदू घुसला आणि दुकानातील लाखो रुपयांची कॅश चोरी केली. हा चोरटा पोलिसांच्या हाती सापडत नव्हता.
सीसीटीव्हीचा डीव्हीआर ताब्यात
नंदू हा टेक्नोसॅव्ही होता. त्याला सीसीटीव्ही आणि डिव्हीआरची टेक्निकल माहिती होती. त्यामुळे कुलरमधून घुसताच तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये येऊ नये म्हणून डिव्हीआर पिशवीत भरायचा. त्यानंतर लाइट लावून बिनधास्त चोरी करायचा. नंदूला दारूचे व्यसन आहे. परंतु, त्याने वाईन शॉप आणि बीअरबारमध्ये चोरी केल्यानंतर एकाही बाटलीला हात लावला नाही. परंतु, दुसऱ्या दिवशी चोरीच्याच पैशाने दारू विकत घेतली.
अशी आहे ‘मोडस ऑपरेंडी’
नंदू हा कुठेही फुटपाथवर राहत होता. तो सायकल रिक्षा घेऊन रात्रीच्या वेळी दुकानाची रेकी करायचा. रिक्षातच झोपत होता. दुकानासमोरील कचरा वेचण्याचा बहाणा करीत दुकानात आत शिरण्याचा मार्ग शोधत होता. हीच त्याची चोरी करायची मोडस होती. प्रत्येक वेळी त्याने हीच मोडस वापरली.
असा पकडला चोर
नंदू डक्टीनमधून घुसला मात्र, पत्रा सडका असल्याने खाली पडला आणि त्याचा पाय मोडला. लंगडत चालत तो दुकानाबाहेर पडला. सक्करदऱ्याचे ठाणेदार धनंजय पाटील यांना रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये नंदूसारखा व्यक्ती दिसला. त्यांना संशय आला. त्यामुळे त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे नंदू (Thief arrested) अडकला. त्याने कुलरच्या डक्टीनमधून चोरी केल्याची कबुली दिली. चोरीचे साहित्य आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली.