नागपूर : जिल्ह्यात प्रवेशासाठी लसीकरण, आरटीपीसीआर आवश्यक!

नवीन नियमावली जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
नागपूर : जिल्ह्यात प्रवेशासाठी लसीकरण, आरटीपीसीआर आवश्यक!
sakal

नागपूर : कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन प्रकाराने जगातील काही देशात धुमाकूळ घातल्यामुळे देशाकडून सुरक्षेच्या दृष्टिकोणातून काळजी घेण्यात येत असून त्यासाठी निर्बंध काही प्रमाण कठोर करण्यात आलेत. जिल्ह्यात येणाऱ्या सर्व देशांतर्गत प्रवाशांचे लसीकरण आवश्यक असेल किंवा ७२ तासांसाठी वैध असलेले आरटीपीसीआर प्रमाणपत्र बाळगणे आवश्यक असल्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा जिल्हाधिकारी विमला आर. यांनी काढलेत.

ओमिक्रॉन या नवीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे असून मास्क, सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य आहे. शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन शासन त्यासाठी उपाय योजना करीत आहे. परंतु, शासकीय उपाययोजनेवर अवलंबून न राहता स्व: पुढाकार घेऊन सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, मोठमोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करू नये, असे त्यांनी सांगितले.

नागपूर : जिल्ह्यात प्रवेशासाठी लसीकरण, आरटीपीसीआर आवश्यक!
..आणि बच्चू कडू धावले..महामार्गावर जखमी पती पत्नी यांना घातले स्वतःच्या गाडीत

पहिल्या व दुसऱ्या कोविड लाटेच्या प्रकारापेक्षा या विषाणूचा प्रसार फार झपाट्याने होत आहे. दुसऱ्या लाटेचा व्हेरियंटचा प्रसारासाठी १० सेकंद लागत होते तर ओमिक्रॉन विषाणूची लागण केवळ ५ सेकंदात होते. या भयावह विषाणूची लागण होऊ नये यासाठी प्रमुख्याने एकमेव उपाय म्हणजे लसीकरण असून पहिल्या व दुसरा डोस नागरिकांनी तत्काळ घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

नियमावलीतील महत्त्वाच्या बाबी

  • कोविड प्रमाणपत्र वैध पुरावा मानला जाईल.

  • वैद्यकीय कारणांमुळे ज्या व्यक्ती, लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी, प्रमाणित वैद्यकीय व्यावसायीकाकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल.

  • १८ वर्षाखालील मुलांसाठी शाळेचे किंवा सक्षम प्राधिकरणाचे ओळखपत्र किंवा पुरावा.

  • कोणत्याही संमेलनासाठी उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या १ हजारांपेक्षा अधिक असल्यास स्थानिक प्रशासनास त्याची माहिती देणे अनिवार्य.

  • नियमाचे उल्लंघन केल्याच्या प्रत्येक प्रसंगी रुपये ५०० इतका दंड, संस्थांना किंवा आस्थापनांना १०,००० रुपये दंड.

  • संस्थेने किंवा आस्थापनेने स्वत: च कोविड अनुरूप वर्तनाचा भंग केल्यास प्रत्येक प्रसंगी रुपये ५०,००० दंड.

  • वारंवार उल्लंघन केल्यास आस्थापना होतील बंद.

  • टॅक्सीमध्ये किंवा खासगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना रुपये ५०० रुपये दंड तसेच सेवा पुरविणारे वाहनचालक, मदतनीस, किंवा वाहक यांना देखील ५०० रुपयांचा दंड.

  • बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सिज, कसूरीच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये १०,००० इतका दंड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com