विदर्भ गारठला; तीन दिवस येलो अलर्ट, नागपूर @ १०.६, बुलडाणा @ ९.२| Yellow Alert | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Winter

विदर्भ गारठला; तीन दिवस येलो अलर्ट, नागपूर @ १०.६, बुलडाणा @ ९.२

नागपूर : विदर्भात अपेक्षेप्रमाणे थंडीचा (Cold) कडाका वाढला आहे. नागपूरसह सर्वच जिल्ह्यातील पाऱ्यात लक्षणीय घट झाली आहे. शितलहरीमुळे दोन दिवसांत नागपूरच्या तापमानात तब्बल पाच अंशांची घसरण होऊन पारा १०.६ अंशांवर आला. तर विदर्भात बुलडाणा येथे सर्वांत कमी तापमानाची नोंद करण्यात आली. तीन दिवस येलो अलर्ट (Yellow alert) असल्यामुळे पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, शिमला, मनालीसह पहाडी भागांमध्ये सध्या जोरदार हिमवृष्टी सुरू आहे. त्याच्या प्रभावामुळे विदर्भात थंडीची (Cold) तीव्र लाट पसरली आहे. लाटेचा सर्वाधिक प्रभाव नागपूर आणि बुलडाणा येथे जाणवला. दोन दिवसांत नागपूरच्या किमान तापमानात पाच अंशांची घसरण होऊन पारा १५.५ वरून १०.६ अंशांवर आला. तर बुलडाण्याच्याही तापमानात जवळपास तेवढीच घट झाली.

हेही वाचा: Republic Day : दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांचे पोस्टर केले जारी

हवामान विभागाने मंगळवारी येथे नोंदविलेले ९.२ अंश सेल्सिअस तापमान विदर्भात नीचांकी ठरले. विदर्भातील इतरही जिल्ह्यांमधील तापमानात एक ते तीन अंशांची घसरण झाली. थंडीच्या (Cold) लाटेने अख्ख्या महाराष्ट्रालाच आपल्या कवेत घेतले आहे. हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील नोंदीनुसार, राज्यात सर्वांत कमी तापमानाची नोंद नाशिक येथे ६.३ अंश सेल्सिअस करण्यात आली.

असह्य गारठा व बोचऱ्या वाऱ्यांमुळे नागपूरकर कमालीचे त्रस्त आहेत. दिवसभर स्वेटर, जर्किन्स, कानटोप्या व शॉल पांघरून फिरावे लागले. सायंकाळ होताच गारठा आणखी वाढतो. त्यामुळे थंडीपासून (Cold) बचाव करण्यासाठी शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने आणखी तीन दिवस येलो अलर्ट (Yellow alert) दिला आहे. वैदर्भीना सध्यातरी थंडीच्या (Winter) कडाक्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे.

हेही वाचा: नवनीत राणांची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘मला विचारून लफडा केला का?

विदर्भातील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

 • शहर तापमान

 • बुलडाणा ९.२

 • गोंदिया १०.२

 • यवतमाळ १०.५

 • वर्धा ११.५

 • नागपूर १०.६

 • अमरावती १०.८

 • अकोला ११.०

 • ब्रम्हपुरी १२.४

 • गडचिरोली १३.०

 • चंद्रपूर १३.२

Web Title: Vidarbha Cold Winter Yellow Alert Mercury Likely To Fall Further Down

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top