डॉक्टरला मुलांच्या अपहरणाची धमकी देऊन मागितली कोटीची खंडणी

डॉक्टरला मुलांच्या अपहरणाची धमकी देऊन मागितली कोटीची खंडणी

नागपूर : डॉक्टर दाम्पत्याच्या दोन्ही मुलांच्या अपहरणाची धमकी (Threat to doctor) देऊन एक कोटींच्या खडणीची मागणी पत्राद्वारे (Letter sent by courier) महिलेने केल्याची खळबळजनक घटना पुढे आली आहे. डॉक्टर दाम्पत्यांनी बेलतरोडी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी तातडीने धमकी देणाऱ्या महिलेला शिताफीने अटक (Woman arrested for threatening) केली. शीतल ईटनकर असे आरोपी महिलेचे नाव आहे. (Woman-arrested-for-threatening-doctor-to-abduct-children)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार सदाशिव पांडे आणि पत्नी राजश्री पांडे हे दोघेही डॉक्टर आहेत. ते विमानतळाजवळील पायोनिअर रेसिडेन्सी पार्क, सोमलवाडा येथे राहतात. त्यांना ७ वर्षांची मुलगी आणि ९ वर्षांचा मुलगा आहे. त्यांचे बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जयहिंद सोसायटी, काचोरे लॉनजवळ उत्कर्ष मॅटर्निटी होया नावाचे हॉस्पिटल आहे.

डॉक्टरला मुलांच्या अपहरणाची धमकी देऊन मागितली कोटीची खंडणी
ब्रेकिंग : अफगाणी नागरिकाला अटक; तालिबानी आतंकवाद्यांशी संबंध

त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ११ जूनला सायंकाळी साडेपाच वाजता एक लिफाफा कुरिअरने आला. डॉ. तुषार यांनी लिफाफा उघडला असता त्यात मुलगा आणि मुलगी यांचे अपहरण करण्याची धमकी देण्यात आली होती. दोन्ही मुलांवर प्रेम असेल तर एक कोटी द्या असे लिहिले होते. पत्र वाचताच डॉ. तुषार यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

त्यांनी पत्नी राजश्री यांना पत्र दाखवले. दोघेही गोंधळात पडले आणि सुचेनासे झाले. त्यांनी लगेच बेलतरोडी पोलिस स्टेशन गाठले. ठाणेदार विजय अकोत यांची भेट घेतली. त्यांनी प्रकरणाला गांभीर्याने घेत गुप्तता बाळगात तक्रार दाखल केली. अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच पोलिस पथके स्थापन करून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी धावपळ सुरू केली.

डॉक्टरला मुलांच्या अपहरणाची धमकी देऊन मागितली कोटीची खंडणी
धोका वाढला! 'मेडिकल'च्या कोविड वॉर्डात दहा मुले भरती

असा मिळाला सुगावा

पोलिसांनी कुरिअर कंपनीच्या एजेंटचे कार्यालय गाठले. त्याने त्या दिवशी पाच महिलांना कुरिअर केल्याचे सांगितले. त्यावरून पाचही महिलांची माहिती काढली. त्यापैकी चार महिलांची चौकशी केली असता काहीही हाती लागले नाही. शेवटचा महिलेने आपला मोबाईल नंबर आणि पत्ता न दिल्याने पोलिसांच्या अडचणी वाढल्या. शेवटी डीसीपी कार्यालयातील सायबर पथकाची मदत घेण्यात आली. एक महिला स्कुटीने कुरिअर कार्यालयाकडे जाताना दिसली. तिच्या वाहनाचा क्रमांक मिळाला आणि पोलिसांना धागा गवसला.

असा लागला छडा

सायबरचे कर्मचारी दीपक तऱ्हेकर आणि मिथून नाईक यांनी सीसीटीव्हीचे फुटेज शोधले. महिला कुठून आली आणि कुठे गेली? याबाबत माहिती घेतली. महिलेच्या घराचा सुगावा लागला. पीआय अकोत यांच्या पीएसआय विकास मनपिया यांच्या पथकाने महिलेला ताब्यात घेतले. तिने उडवाउडवीचे उत्तरे देत ती मी नव्हेच असा पवित्रा घेतला. शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्हा कबुल केला.

(Woman-arrested-for-threatening-doctor-to-abduct-children)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com