Chocolate day : लिमलेटच्या गोळीऐवजी आता जिभेवर चॉकलेटची गोडी

Chocolate day : लिमलेटच्या गोळीऐवजी आता जिभेवर चॉकलेटची गोडी

गडचिरोली : कधीकाळी बच्चेकंपनीसाठी गोड वस्तू म्हणजे गुळाचा खडा किंवा साखरेच्या गाठ्या वगैरे पदार्थ (chocolate candy) असायचे. पुढे छोट्या पेपमिंट आणि लिमलेटच्या गोळ्या येऊ लागल्या. त्यानंतर छोटे चॉकलेट्स येऊ लागले. परंतु, मागील काही वर्षांत कोकोपासून तयार होणाऱ्या चॉकलेट्सची (Chocolate made from cocoa) गोडी लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या जिभेवर फिरत आहे. (Now-a-chocolate-candy-on-the-tongue-instead-of-a-limelet-candy)

पूर्वी कोकोपासून बनविलेल्या चॉकलेट्सच्या वड्या ही चैनीची गोष्ट होती. हे चॉकलेट्स गर्भश्रीमंतांच्याच हातात किंवा त्यांच्या गोंडस बाळांच्या हातात दिसायचे. पण, आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत अगदी अतिदुर्गम भागातही चॉकलेटने आपले प्रस्थ तयार केले आहे. त्यामुळे आता हे चॉकलेट्स अनेकजण सर्रास खाताना दिसतात. चॉकलेट्स बालकांचे आवडते असले, तरी विविध कंपन्यांचे मिल्क चॉकलेट्स किंवा डार्क चॉकलेट्स तरुण व सर्वच वयाच्या नागरिकांचे आवडते झाले आहेत.

Chocolate day : लिमलेटच्या गोळीऐवजी आता जिभेवर चॉकलेटची गोडी
१२ वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराने लग्न करताच प्रेयसीची आत्महत्या

ग्राहकांची पसंती आणि गरज लक्षात घेत अनेक कंपन्यांनी या चॉकलेट्समध्येही बरेच बदल केले आहेत. कधीकाळी परदेशाचा मानला जाणारा हा पदार्थ आता भारतात बऱ्यापैकी रुजला आणि इथल्या संस्कृतीत रुतून बसला आहे. तसा चॉकलेट हा शब्द स्पॅनिश भाषेतील मानला जातो. या चॉकलेटचा इतिहास शोधून गेल्यास चक्क माया और एजटेक संस्कृतीपर्यंत त्याची मुळे पोहोचलेली आहेत. याचा संबंध मध्य अमेरिकेशीही आहे.

कोकोपासून तयार होणारा हा पदार्थ थोडा कडू असतोच. विशेष म्हणजे चॉकलेटचा प्रमुख घटक असलेल्या कोको वृक्षाचा शोध २००० वर्षांपूर्वी अमेरिकेच्या वनांमध्ये लागला होता. या वृक्षाच्या शेंगांतून ज्या बिया निघतात त्यापासून चॉकलेट तयार करतात. मुळात कडसर असलेल्या चॉकलेटला गोड बनविण्याचे श्रेय युरोपला जाते. पूर्वी कोको पावडरपासून पेय पदार्थ बनविले जायचे. पण, त्यात दूध आणि साखरेचा वापर करून मिठाई अर्थात चॉकलेट युरोपनेच बनविले.

Chocolate day : लिमलेटच्या गोळीऐवजी आता जिभेवर चॉकलेटची गोडी
पेरणीसाठी गेलेली आई परतलीच नाही, शेवटी मृतदेह लागला हाती

डॉक्टरांचा सल्लाही ऐका

कोणतीही गोष्ट अतीप्रमाणात खाणे योग्य नाही. त्यामुळे चॉकलेट्सचे नियमितपणे सेवन करू नये, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत चलाख यांनी दिला आहे. चॉकलेटसारख्या पदार्थात पौष्टिक तत्त्व कमी असतात. शिवाय जास्त प्रमाणात खाल्ल्यास मुलांचे दात किडतात. त्यामुळे प्रमाणात खावे व जेवणाच्या वेळेच्या दरम्यान खाऊ नये, असाही सल्ला डॉ. चलाख यांनी दिला आहे.

(Now-a-chocolate-candy-on-the-tongue-instead-of-a-limelet-candy)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com