esakal | गडचिरोली जिल्ह्यातील इंद्रावती नदीत प्रवासी नाव बुडाली; १३ जण सुरक्षित अनेक जण बेपत्ता 
sakal

बोलून बातमी शोधा

passengers boat sink in indravati river

सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली येथुन छत्तीसगड राज्यात एका कार्यक्रमासाठी हे प्रवासी दोन लहान नावेने गेल्याची माहिती मिळत आहे. कार्यक्रम आटोपून परत येताना काल संध्याकाळी सात ते आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

गडचिरोली जिल्ह्यातील इंद्रावती नदीत प्रवासी नाव बुडाली; १३ जण सुरक्षित अनेक जण बेपत्ता 

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली ;  गडचिरोलीत एक प्रवासी नाव बुडाल्याने अनेक जण बेपत्ता झाले आहेत. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील सिरोंचा तालुक्यात असलेल्या इंद्रावती नदीत ही घटना घडली. बोटीतून प्रवास करत असलेले तेरा जण सुरक्षित बाहेर पडले, परंतु आणखी काही जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.

नक्की वाचा - हो साहेबऽऽ चोरी केली आम्ही; मात्र, एकाही पैशाला हात लावला नाही; वाचा काय सांगतात चोरटे

सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली येथुन छत्तीसगड राज्यात एका कार्यक्रमासाठी हे प्रवासी दोन लहान नावेने गेल्याची माहिती मिळत आहे. कार्यक्रम आटोपून परत येताना काल संध्याकाळी सात ते आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

ठळक - छे छेऽऽ पेपर तर ‘नीट’ दिला; सहाशे गुणांची अपेक्षा असताता शून्य गुण कसे मिळणार, विद्यर्थिनी गेली हायकोर्टात

महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील दुर्गम नक्षलग्रस्त भागात ही घटना घडल्याने प्रशासनाला उशिरा माहिती मिळाली. शोधमोहिमेत वन विभाग आणि पोलिसांची टीमचा समावेश असून युद्धपातळीवर बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. 

अधिक माहितीसाठी - ऐन दिवाळीत कांद्याचे वांदे, फराळातूनही कांदा होणार गायब

राञी  तेरा जण सुरक्षित बाहेर पडले  तर अजूनही आणखी दोन ते तीन नागरीक  बेपत्ता आहेत.  त्यांच्या शोधासाठी वनविभाग आणि पोलीसांची शोध मोहीम सुरु आहे छत्तीसगड वन विभागाची मदत घेत शोध मोहिम सुरू आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image