पाइपगण आली अन् वन्यप्राण्यांची पळापळ झाली

pipe gun
pipe gun

वाशीम : ‘गरज ही शोधाची जननी आहे’, ही म्हणीचा प्रत्यय सध्या शेतकरी बांधव घेत आहेत. कारण, सध्या शेतकऱ्यांच्या शेतात खरिपातील तूर, कपाशी ही पिके आहेत. तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, भाजीपाला वर्गीय पिके आहेत. मात्र, वन्यप्राणी या पिकांत धुडगूस घालून त्याचे अतोनात नुकसान करतात. परिणामी, उत्पादनात घट होते. यावर उपाय म्हणून ग्रामीण भागात सध्या ‘पाइपगण’ ही मोठा दिलासा ठरत आहे.

शेतीव्यवसायात दिवसेंदिवस लागवड खर्च वाढत आहे. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना फारसे उत्पादन हाती येत नाही. त्यातच वन्य प्राणी शेतात धुडगूस घालतात ते वेगळे. वनक्षेत्रालगत तसेच इतर शेतशिवारात रोही, रानडुकरे, हरिण, काळवीट आदी वन्यप्राण्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना डोळ्यांत प्राण आणून रात्रंदिवस शेतातील पिकांची रखवाली करावी लागते. 

वन्यप्राणी करतात पिकांचे नुकसान
शेतकरी सायंकाळनंतर घरी गेल्यास रात्री उशिरा हे वन्यप्राणी शेतात उभ्या असलेल्या तुरीच्या शेंगा, कपाशीच्या बोंड्या खातात. तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांत रानडुकरे, रोही या वन्यप्राण्यांचे कळत खूप नुकसान करतात. त्यामुळे कडाक्‍याच्या थंडीत शेतकरी शेतात शेकोटी, विद्युत दिवे शेतात लावत आहेत. मात्र, त्यानंतरही वन्यप्राणी पिकांचे नुकसान करतात. 

एक ते दीड किलोमीटर पर्यंत आवाज
उपाय म्हणून सध्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये ‘पाइपगण’ एक चांगला दिलासा निर्माण झाली आहे. ही ‘पाइपगण’ वन्यप्राण्यांना कुठल्याही प्रकारे इजा न पोहचविता शेतापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावरील वन्यजीवांना सतर्कतेचा इशारा देते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधव सध्या रात्री शेताच्या रखवालीकरिता या ‘पाइपगण’चा मोठ्या प्रमाणावर उपयोग करीत असल्याचे दिसून येत आहे.

अशी आहे ‘पाइपगण’ची रचना
‘पाइपगण’ची निर्मिती ही दोन व दीड इंच पीव्हीसी पाइपद्वारे केलेली आहे. दोन इंच आकाराच्या पाइपला मागील बाजूस घट्ट बसविलेले झाकण, त्यास छिद्र पाडून गॅस पेटविण्याचे लायटर, दोन इंच आकाराच्या पाइवर एक छिद्र, सदरील छिद्र बुजविण्याकरिता एक पट्टी, त्यासमोर दोन इंच पाइपला समोर एक इंच पाइप बसेल अशी केलेली रचना आहे. याकरिता जास्त खर्च देखील येत नसून, वजन सुद्धा कमी आहे.

रासायनिक क्रियेतून बंदुकीप्रमाणे आवाज
‘पाइपगण’मध्ये शेतकरी बांधव रासायनिक घटक टाकतात. त्यावर पाण्याचे काही थेंब टाकल्यामुळे त्यापासून रासायनिक क्रीया घडते. त्यानंतर लायटरचे बटन दाबताच बंदुकीप्रमाणे जोरदार आवाज बाहेर पडतो. त्यामुळे वन्यप्राणी सदरील शेतापासून दोन हात दूर राहणे पसंत करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com