वाळू माफियांचे धाबे दणाणले; राष्ट्रीय महामार्गावर रेतीचे तब्बल 9 ट्रक पोलिसांनी पकडले 

police Caught illegal trucks full of sand in Amravati district
police Caught illegal trucks full of sand in Amravati district

तिवसा (जि. अमरावती) : राष्ट्रीय महामार्ग तिवसा पोलीस स्टेशन हद्दीतून रसकाळी 7 वाजतच्या  सुमारास कन्हान रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रक, टिप्परसह एकूण 9 वाहने आयपीएस अधिकारी श्रेणीक लोढा यांनी पकडून तिवसा पोलीस स्टेशनला चौकशीसाठी ठेवले आहे.एकाच वेळी 9 ट्रक सह एक ट्रॅक्टरवर कारवाई केल्याने अनेक वाळू माफियाचे चांगलेच धाबे दणाणले आहे. 

आयपीएस अधिकारी श्री लोढा यांनी अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे कन्हान रेतीचे 35 ट्रक पकडून धडक कारवाई केल्यानंतर त्यांनी काल सकाळी त्यांनी तिवसा शहरात पहाटे बुधवारी नागपूर- अमरावती राष्ट्रीय महामार्गा क्रमांक 6वर जिल्ह्याचे अगदी सिमेवर वाळू माफियाच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या, तिवसा राष्ट्रीय महामार्गा वरून रोज शेकडो वाळूची अवैधरित्या वाहतूक होते मात्र या अवैध वाहतुकी तिवसा महसूलची मूकसंमती असल्याने हे वाळू माफिया राष्ट्रीय महामार्गावरून दिवस रात्र सुसाट धावतात, 

काल अचानक तिवसा हद्दीतून वाहतूक करणाऱ्या एकूण 9 कन्हान रेतीच्या मालवाहू ट्रकला पकडून धडक कारवाई केल्याने स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी प्रश्न उपस्तित केले आहे.काल सकाळच्या वेळेला जिल्ह्याचे सीमेवर असलेल्या भारवाडी उडानपुला जवळ श्री. लोढा यांनी आपले पथक तैनात ठेवून 9ट्रकवर कारवाई केली त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्याच्या वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे 

या कारवाई मध्ये पकडण्यात आलेल्या वाहनांमध्ये एमएच -27,बीडब्लू -7799,एमएच 40,बीजी-0060,एमएच  27-बीएक्स 6699,एमएच 27-एक्स-8186,एमएच  40 एके-8310,एमएच40-बीजी  2556,एमएच21-एक्स 7155,एमएच 43-बीजी 7824,एमएच 32 - 6070 या मालवाहू ट्रक व टिप्पर वाहनांचा समावेश असून हे सर्व वाहने नियमात की नियमबाह्य? याप्रकरणी पुढील तपास तिवसा पोलीस स्टेशन,महसूल व आरटीओ विभाग यांच्या चौकशीत स्पष्ट होणार असल्याचे बोलल्या जात आहे.ही कारवाई आयपीएस अधिकारी श्रेणीक लोढा,एपीआय हेमंत चौधरी, एनसिपी संदीप वंजारी, प्रशांत तुकडे, अस्लम, कमलेश, पवन ठाकरे, पंकज येवले, गजानन जगताप, यांनी केली. 

वाळू माफियांना महसूल प्रशासनाचे अभय

तिवसा शहरातुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्गा वरून रोजचे वाळू, मुरूम गौण खनिजची अवैधपणे वाहतूक होते मात्र यावर स्थानिक महसूल कारवाई करत नसल्याने वाळू माफियांची चांगलीच कमाई होताना दिसत आहे मात्र काल श्री.लोढा यांच्या पथकाने केलेल्या कारवाईने स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्न उपस्तित केले जात आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com