esakal | मतदानासाठी पाच जिल्ह्यांतून बॅलेट यूनिट, साडेतीन हजार मशीनची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

preparation for grampanchayat election in yavatmal

जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या गावांमधील एकूण तीन हजार 72 प्रभाग असून, तीन हजार 92 मतदान केंद्रे आहेत.

मतदानासाठी पाच जिल्ह्यांतून बॅलेट यूनिट, साडेतीन हजार मशीनची मागणी

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी साहित्य जमा करण्याचे काम निवडणूक विभागाकडून सुरू आहे. जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी साडेतीन हजार बॅलेट युनिट लागणार आहेत. जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात बॅलेट युनिट उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत शिल्लक असलेले दोन हजार 844 बॅलेट मशीन अकोला, नंदुरबार, वर्धा, परभणी आदी पाच जिल्ह्यांमधून बोलविण्यात आलेली आहेत.

हेही वाचा - वाघ मालकाला नेत होता ओढत, पण कुत्र्यानं केलेलं कृत्य पाहून मृत्यूच्या दारात असलेला मालकही झाला...

जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या गावांमधील एकूण तीन हजार 72 प्रभाग असून, तीन हजार 92 मतदान केंद्रे आहेत. अशात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्यादृष्टीने आवश्‍यक असलेले साहित्य सध्या निवडणूक विभाग गोळा करीत आहे. त्यात प्रामुख्याने मशीन, मेमरी, कंट्रोल युनिट, मार्कर पेन, मेटल्स सील यांसह इतरही साहित्यांची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे. सध्या जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या साहित्यांची संख्या बघून उर्वरित साहित्य इतर जिल्ह्यांतून बोलविण्यात येत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याला आवश्‍यक असलेले बॅलेट युनिट वर्धा, अकोला, वाशीम, परभणी, नंदुरबार या जिल्ह्यांतून बोलविण्यात आलेली आहेत. कंट्रोल युनिट नागपूर येथून बोलविण्यात आलेले आहेत.

हेही वाचा - भंडारा रुग्णालय आग : शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांबाबत समोर आली धक्कादायक माहिती

निवडणुकीच्यादृष्टीने शिक्षण, महसूल, जिल्हा परिषद, तहसील कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूक विभागाला तीन हजार 502 बॅलेट युनिटची आवश्‍यकता भासणार आहे. त्यानुसार सध्या निवडणूक विभागाच्या स्टोअर्समध्ये थोड्याफार प्रमाणात बॅलेट युनिट उपलब्ध आहेत. जिल्ह्यात एकाच टप्प्यात 980 ग्रामपंचायतींसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मशीन लागणार आहेत. तेवढ्या मशीन ग्रामपंचायत निवडणूक विभागाकडे नाहीत. मतदानासाठी दोन हजार 844 बॅलेट युनिटची गरज होती. त्याची डिमान्ड प्रशासनाने लगतच्या जिल्ह्यांतून पूर्ण केली आहे. अकोला जिल्ह्यातून शंभर, मूर्तीजापूर 100, नंदुरबार 100, वर्धा 200, परभणी जिल्ह्यातून 100 बॅलेट युनिट व नागपूर जिल्ह्यातून कंट्रोल युनिट बोलविण्यात आलेले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. येत्या शुक्रवारी (ता.15) जिल्ह्यातील 925 ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

हेही वाचा - काचाच्या भिंतीतून बघितला मुलीचा चेहरा; ‘बेबी ऑफ सुकेशनी आगरे’ असे उच्चारले अन्हृ दयाचा ठोका चुकला

दिव्यांग कर्मचाऱ्यांना ड्यूटी -
निवडणूक कार्यक्रमांतून दिव्यांग कर्मचाऱ्यांना वगळण्यात यावे, असे स्पष्ट आदेश आहेत. विशेष म्हणजे शिक्षक संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे. तरीसुद्धा काही तहसील कार्यालयांत दिव्यांग शिक्षक, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा असून, तहसीलकडे यादी पाठविणाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

loading image