Professor Killed Wife Yavatmal
Professor Killed Wife YavatmalSakal

गुप्तांगावर चाकूने वार करून पत्नीची हत्या, प्राध्यापक पतीचं कृत्य

यवतमाळ : प्राध्यापक पतीने पत्नीच्या गुप्तांगावर चाकूने वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळमधील आर्णी (Aarni Yavatmal) येथे प्रतिष्ठीत कॉलनीत ही घटना घडली आहे. विमल मारोती आरके, असे या मृत महिलेचे नाव असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Professor Killed Wife Yavatmal
''...तरी पवारसाहेब'', गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश राणेंची पहिली प्रतिक्रिया

आर्णी येथील स्वामी समर्थ नगरमधील रहिवासी मारोती आरके आपल्या कुटुंबीयांसह राहतात. मारोती हे लोणी येथील राष्ट्रीय आश्रम उच्च माध्यमिक विद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे रोजच पत्नीसोबत भांडण व्हायचे. रविवारी हे भांडण विकोपाला गेले. दुपारी १२ वाजतादरम्यान प्राध्यापक मारोती आरके यांनी पत्नी विमल आरके यांच्या गुप्तांगावर चाकूने सपासप वार केले. त्यामध्ये विमल गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारारासाठी यवतमाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान आज रात्री एकच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

मारोती आणि विमला यांना आठ आणि पाच वर्षांची अशी दोन मुले आहेत. आईच्या जाण्याने मुलांना देखील धक्का बसला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी प्राध्यापकाने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com