
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमध्ये येथील प्राध्यापक अनिलकुमार सौमित्र यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना संबोधून वादग्रस्त विधान केलं आहे. "
अमरावती : भारतात कोण, कधी आणि कोणत्यावेळी करेल हे काहीही सांगता येत नाही. नेहमीच लोकं आपल्या राष्ट्रपुरुषांबद्दल किंवा दिग्गज व्यक्तींबद्दल वादग्रस्त विधान करत असतात. असाच प्रकार अमरावतीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमध्ये घडला आहे. ज्यामुळे काही संघटनांनी इथल्या प्राध्यापकांच्या विरोधात ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.
अधिक माहितीसाठी - गाढ झोपेत असताना आला मोठा आवाज, घराबाहेर धाव घेताच दिसलं थरारक दृश्य
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमध्ये येथील प्राध्यापक अनिलकुमार सौमित्र यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना संबोधून वादग्रस्त विधान केलं आहे. "महात्मा गांधी हे पाकिस्तानचे राष्ट्रपिता असून त्यांच्या सारखे करोडो पुत्र आहेत काही लायक आहेत तर काही नाहीत. तसंही महात्मा गांधी हे भारताचे पिता होऊच शकत नाही" असं सौमित्र यांनी म्हंटलंय त्यामुळे युवक काँग्रेस , विर भगतसिंग विद्यार्थी परिषद , ए.आय.एस.एफ. , सष्ट्रवादी युवक काँग्रेस , एन.एस.यु.आय , प्रहार विद्यार्थी संघटना , टिपु सुलतान सेना , सष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस यासारख्या काही संघटनांनी IIMC मध्ये ठिय्या आंदोलन पुकारलं आहे.
पत्रकार आणि प्रसारण माध्यम हे लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे त्यामुळे अशसी विचारांच्या प्राध्यापकाला IIMC नं नोकरी देणं वाईट आहे. लोकशाहीचा हा स्तंभ वाचविण्यासाठी प्रा.अनिलकुमार सौमित्र यांची ५ दिवसात तातडीनं हकालपटटी करण्यात यावी असा ईशारा देत हे आंदोलन सुरु आहे.
अधिक वाचा - पुणे- नागपूर शिवशाहीत आढळलं संशयास्पद पार्सल; चालकानं बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन
अनिलकुमार सौमित्र हे संघ आणि भाजपच्या विचारसरणीचे आहेत त्यामुळे त्यांचे विचार हे देशाच्या हिताचे नाहीत. तसंच IIMC मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही सौमित्र यांचे विचार घातक आहेत असंही विरोधकर्त्या संघटनांच म्हणणं आहे त्यामुळे सौमित्र यांची लवकरात लवकर हकालपट्टी करण्यात यावी अन्यथा आंदोलन सुरूच राहील असा ईशाराही या संघटनांनी दिला आहे.
संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ