रुग्ण नागपुरात, तुटलेला हात अमरावतीच्या शवागारात

Road Accident
Road AccidentRoad Accident

अमरावती : गुजरातवरून नागपूरला जाण्यासाठी निघालेल्या ट्रकचालकाचा अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्तात अपघात (Road accident) झाला. या अपघातात चालकाचा एक हात खांद्यापासून वेगळा झाला. हात सद्य:स्थितीत अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात पडून आहे. रुग्णावर नागपुरात उपचार सुरू आहेत. पंकज मोहनलाल विश्वकर्मा (२२, रा. बुरादेवी, उत्तर प्रदेश) असे गंभीर जखमी ट्रकचालकाचे नाव आहे.

शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पंकज हा क्लीनरसह मालवाहू ट्रक गुजरात येथून नागपूरला घेऊन जात होता. अमरावती ते नागपूर महामार्गावर तिवसा गावाजवळ पहाटेच्या सुमारास ट्रकचालक पंकज विश्वकर्मा याने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. दरम्यान, पंकज हा ट्रकच्या खाली उतरत असताना अचानक विरुद्ध दिशेने वाहन आले. त्याने पंकजला धडक (Road accident) दिली. ही धडक त्याच्या डाव्या हातावर बसल्याने हात खांद्यापासून तुटून खाली (Arm broken) पडला.

Road Accident
महिलेने दिला लग्नास नकार; विवाहित प्रियकराने खून करून केली आत्महत्या

घटनेच्या वेळी क्लीनर कॅबिनमध्ये झोपला होता. त्याने रुग्णवाहिकेतून पंकज विश्वकर्मा याला तुटलेल्या हातासह अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथे तुटलेला हात जोडणे शक्य नव्हते. प्रकृती गंभीर असल्याने पंकजला पुढील उपचारासाठी क्लीनरने नागपूरला हलविले. इर्विन रुग्णालयातील ग्रामीण पोलिसांनी आलेला मेमो तिवसा पोलिसांना पाठविला व घटनेची माहिती दिली.

तुटलेला हात (Arm broken) डॉक्टरांनी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्याचे आदेश दिले. तिवसा पोलिसांनी जखमी ट्रकचालकाच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. नातेवाइक दोन दिवस उशिरा नागपुरात पोहोचले. परंतु, नातेवाइकांना गंभीर जखमी चालक पंकजला तेथे सोडून अमरावतीत येणे शक्य होत नाही. त्यामुळे तुटलेला हात अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात आणि पंकज विश्वकर्मावर नागपुरात उपचार सुरू आहेत.

Road Accident
मृणाल ठाकूरने शेअर केले क्लासी फोटो; साडीची किंमत माहितीये?

हाताच्या विल्हेवाटीसाठी हवी सहमती

पंकज विश्वकर्मा याच्या तुटून पडलेल्या हाताची (Arm broken) विल्हेवाट लावण्यासाठी कुटुंबातील सदस्यांची सहमती आवश्यक आहे. त्याचे नातेवाईक अमरावतीत येईपर्यंत तुटलेला हात तसाच शवागारात ठेवावा लागेल, असे इर्विनच्या डॉक्टरांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com