लॉकडाउनमध्ये अडकली या मुख्य रस्त्यांची कामे; पावसाळ्यात या परिणामांना जावे लागणार सामोरे

telhara road.jpg
telhara road.jpg

तेल्हारा (जि.अकोला) : कोरोनाच्या संसर्गामुळे विविध राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग वरील रस्त्यांची विकास कामे सुद्धा बंद पडले होते. मात्र त्यातच काही दिवसांवरच पावसाळा लागणार आहे. त्यामुळे सदर अर्धवट असलेले रस्ते विकास कामे ठप्प पडून रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात वाहतुकीस अडथडा निर्माण होईल अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे.

शासनाने 21 एप्रिल पासून रस्ते विकास कामांना सुरू करण्याची परवानगी दिली. बऱ्याच ठिकाणी ती सुरू झाली. मात्र अल्प कामगारात काम कसे पूर्ण होईल कारण जास्त करून या विविध विकास कामावरील खासगी कँपनीचे कंत्राटदार यांनी अधिकतर कामावर परप्रांतीय ठेवलेले असल्याने सदर त्यांना गेल्या महिन्या दीड महिन्या पासून या अनेक ठेकेदाऱ्यांनी वाऱ्यावर सोडून पळ काढला होता. त्यामुळे त्या मजुरांवर उपास मारीची पाळी आली होती.

त्यामुळे त्यांनी आपल्या गावी पायीच प्रवास करीत निघून गेले. त्यामुळे आता शासनाने रस्ते विकास कामासाठी परवानगी दिल्याने विकास कामे कसे पूर्ण होतील या याबाबत प्रशासना समोर आव्हानच आहे. तेल्हारा तालुक्यातील आडसूड ते तेल्हारा ते हिवरखेड अकोट, वरवट ते तेल्हारा ते पाथर्डी मार्ग वणीवारुळा अकोट, या मुख्य रस्त्यासह छोट्या मोठ्या नदी नाल्यावरील पूल ही विकास कामे असून यातील फक्त हिवरखेड ते तेल्हारा याच विकास काम सुरू झाले असून मात्र काम अत्यंत कासवगतीने सुरू असल्याने रस्ते वर मुरुमाऐवजी चक्क पिवळ्या मातीचा वापर करण्यात आला आहे. 

तर आडसूड ते तेल्हारा वरवट ते पाथर्डी मार्ग वणी वारुळा या रस्ते खोदून ठेवण्यात आले असून मात्र काम होताना दिसत नाही. त्यामुळे काही दिवसावरच पावसाळा येऊन ठेपला असून या तालुक्यातील नादुरुस्त रस्त्यावर वाहने अडकून पडतील व प्रचंड वाहन कोंडी व नागरिकांचे हाल होण्याचे स्पष्ट चित्र डोळ्या समोर आहे.

ही आहेत ठप्प विकास कामे

  • राज्य महामार्ग क्र 279 आडसूड ते तेल्हारा हिवरखेड मार्ग 23.300 किलोमीटर
  • राज्य महामार्ग क्र 271 वरवट ते तेल्हारा ते वणी वारुळा किलोमीटर
  • राज्य महामार्ग 47 सावरामंचनपुर, अकोट ते हिवरखेड 44 किलोमीटर
  • तळेगाव डवला गौतमी नदी वरील किंमत 9.61 कोटी
  • वडगाव रोठे गावाजवळील पूल
  • अडगाव खुर्द गावाजवळील पूल

प्रलंबित कामे करण्याचे सूचना
जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये 21 एप्रिल पासून कामे सुरू करण्याचे आदेशात नमूद आहे. त्यामुळे तेल्हारा सार्वजनिक बांधकाम उपविभागातील प्रलंबित कामे करण्याचे सूचना कंत्राटदार यांना दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com