हातावर पोट असलेल्या सलून, लाँड्री व्यावसायिकांचा जीव टांगणीला

hair salon.jpg
hair salon.jpg

मूर्तिजापूर (अकोला) : संपूर्ण जग वेठीस धरणाऱ्या कोरोनाला थोपविणाऱ्या लॉकडाउनमुळे सलून, लाँड्री, सुतारकाम, विटनिर्मिती, बांधकाम अशा लहानमोठ्या व्यवसायांवर उपजिविका अवलंबून असणाऱ्या मोठ्या प्रमाणातील समाजघटकांचा जीव टांगणीला लागला आहे.

आर्थिक नियोजन बिघडले
पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या लॉकडाउनचा 25 वा दिवस आज मागे पडत असताना एकीकडे कोरोना बाधितांची गती मंदावणारे चित्र आशादायक असले, तरी अशा व्यावसायिकिंच्या तोंडचे पाणी पळविणारा प्रकार निराशाजनक आहे. बलुतेदारीतील असंख्य व्यवसाय, स्वरूप बदलले असूनही अर्थव्यवस्थेचा मोठा डोलारा सांभाळणारे आणि जनसामान्यांसाठी अत्यावश्यक सेवांएवढेच महत्त्वपूर्ण आहेत. काही उदाहरणे वानगीदाखल द्यायची झाल्यास कपडे स्वच्छ व नेटके करणारे परीट (लाँड्री), लाकूडकाम करणारे सुतार (फर्निचर), मातीच्या भांड्यांवर उपजिविका आसणारे कुंभार (पॉट्टरी), लोखंडी अवजारांवर उपजिविका असणारे लोहार आणि केशकर्तन व्ययसायवर उपजिविका असणारे नाभिक (सलून) या व्यावसायिकांसमवेत बांधकाम व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुशल व अकुशल कामगिरांची नावे वानगीदाखल देता येतील. 

लहानमोठ्या व्यावसायिकांना लॉकडाउनचा फाटका
मातीची भांडी विकून उपजिविका चालविणारा कुंभार समाज बांधव उन्हाळ्याची वाट आपल्या व्यवसायाच्या भारभराटीसाठी बघत असतो. गरिबांचा फ्रीज आसे ज्यांचे वर्णन केल्या जाते, त्या माठांच्या विक्रीतून व विट निर्मीतीतून कुंभार समाजबांधव कुटुंबाची उपजिविका चालवितो आणि आपली भविष्याची बेगमी करून ठेवतो. तो आज हताश होऊन बसला आहे. नाभिक समाज बाःधवांची राज्यभरातील संख्या 40 लाखांवर आहे. त्यापैकी 35 लाख केशकर्तन व्यवसायावर अवलंबून आहेत. आर्थिकदृष्ट्या दूर्बल घटकात मोडणाऱ्या 80 टक्के नाभीक बांधवांची दुकाने भाड्याची आहेत. त्यातील असंख्य आर्धा वाटी किंवा मजुरीने काम करणारे आहेत. 8 ते 15 दिवसांचा अन्नधान्य साठा करू शकणारे हे व्यावसायिक लॉकडाउनचे 25 दिवस पूर्ण झाल्यामुळे उपासमारीचा सामना करीत आहेत. लॉँड्री व्यवसायावर भिस्त असलेला परीट समाजबांधव लॉकडाउनमध्ये व्यवसाय बंद असल्यामुळे मेटाकुटीस आला आहे. आशा लहानमोठ्या व्यावसायिकांना लॉकडाउनचा मोठा फाटका बासत आहे. समाजस्वास्थ्य त्यामुळे धोक्यात येत आहे. अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, सॕनिटायझेशन, स्वच्छता अशा अटींच्या अधिनस्थ राहून हे व्यवसाय सुरू करण्याचा विचार शासनाने करावा, अशी मागाणी जोर धरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com