

Samruddhi Expressway Accidents
esakal
धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : दुर्गामातेची मूर्ती आणण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर काळाने गाठले अन् आनंदाच्या प्रवासाचे रूपांतर शोकांतिकेत झाले. या अपघाताने पुन्हा एकदा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला.
गेल्या साडेतीन वर्षांत या महामार्गावर ६३३ अपघातांमध्ये तब्बल ५७२ जणांना जीव गमवावा लागला, अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली. त्यामुळे वेगवान प्रवासासाठी उभारलेला हा महामार्ग अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे मृत्यूचा सापळा ठरत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
आठ महिन्यांत १२८ जण ठार डिसेंबर २०२२ ते ३१ जानेवारी २०२६ या काळात समृद्धी महामार्गावर ४९१ अपघात झाले असून, त्यात ४४४ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या अवघ्या आठ महिन्यांत १४२ अपघातांमध्ये १२८ जणांना प्राण गमवावे लागले. माहितीच्या अधिकारातून ही आकडेवारी समोर आली.
सुरक्षेचा प्रश्न कायम ‘समृद्धी’वरील अपघातांच्या कारणांचा अभ्यास करताना ‘महामार्ग संमोहन’ हे एक कारण असल्याचे नमूद करण्यात आले. वाहन दीर्घकाळ एकाच दिशेने सरळ वेगाने धावत राहिल्यास चालकाची हालचाल आणि एकाग्रता कमी होते.
अशा स्थितीत चालकाची प्रतिक्रिया देण्याची क्षमता प्रभावित होते. या अवस्थेला ‘महामार्ग संमोहन’ असे संबोधले जाते. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही चिंतेचा विषय ठरत आहे.
नियमांचे पालन नाही अभ्यासातील निरीक्षणानुसार ५१ टक्के ट्रकचालक लेन बदलण्यासंदर्भातील नियमांचे पालन करत नसल्याचे आढळले. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक, वेग, लेन कटिंग आणि चालकांची एकाग्रता यावर नियंत्रणाची गरज अधोरेखित होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.