धक्कादायक! ६६ हजार कर्जदार सावकारांच्या दारात; ४६२ कोटी रुपयांचे कर्ज १५ टक्के व्याजाने वाटप

 Loan
Loanesakal

अमरावती : शेतीसह व्यवसायासाठी व इतर कामासाठी लागणाऱ्या भांडवलासाठी जिल्ह्यातील ६६ हजार ४०७ जणांनी खासगी सावकारांचा आश्रय घेतला आहे. या कर्जदारांना सावकाराकडून ४६६ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. यामध्ये कृषिकर्ज समाविष्ट नसून बिगर कृषिकर्ज घेणाऱ्यांचीच संख्या अधिक असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या माहितीत नमूद आहे. बिगर तारण ठेवणाऱ्या कर्जदारांची संख्या १४६२ इतकी आहे.

 Loan
Akola News: कोतवाली पोलिस स्टेशनमधील डीबीरूममध्येच चाकू हल्ला; तक्रार करणाऱ्याचेच कृत्य

जिल्ह्यातील चौदा तालुक्यात ५८८ परवानाधारक सावकार असून त्यांनी बिगर कृषिकर्ज वितरित केले आहे. शेतीच्या मशागतीसह व्यवसायासाठी लागणाऱ्या भांडवलासाठी कर्जदारांनी स्वतःजवळील मालमत्ता गहाण (तारण) ठेवून कर्ज घेतले आहे. या कर्जदारांकडून प्रतिवर्षी १५ टक्के तर बिगर तारण कर्ज घेणाऱ्या कर्जदारांकडून १८ टक्के व्याज घेण्याची मुभा आहे. यापेक्षा अधिक व्याज आकारल्यास फौजदारी कारवाई करण्याची तरतूद आहे. आरोप सिद्ध झाल्यास पाच वर्षे कारावासाची तरतूद कायद्यात आहे.

 Loan
Success Story : दोन मुलांची आई जिद्दीने बनली पोलीस; मनीषा कुटेंना पहिल्याच प्रयत्नात दोन पदांवर यश

जिल्ह्यातील ६६,४०७ कर्जदारांनी आर्थिक गरजेपायी खासगी सावकारांकडून व्याजाने कर्ज घेतले आहे. तारण देत कर्ज घेणाऱ्यांची संख्या ६४ हजार ९४५ असून त्यांना ४६२ कोटी रुपये कर्ज देण्यात आले आहे. तर बिगर तारण कर्जदार १४६२ असून त्यांना ३ कोटी ३१ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.

कृषिकर्ज घेण्यात आले नसल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने म्हटले असले तरी अनेकांच्या शेती मात्र कर्जासाठी सावकारांकडे तारण आहेत, हे वास्तव आहे. त्याची नोंद उपनिबंधक कार्यालयाकडे नाही. सावकारांकडून देण्यात आलेल्या माहितीतही त्याचा उल्लेख नाही.

खासगी सावकारांनी वाटलेल्या कर्जाची स्थिती

परवानाधारक सावकार : ५८८

एकूण कर्जदार : ६६,४०७

कर्ज वाटप : ४६६ कोटी रुपये

तारण कर्जदार : ६४,९४५

कर्ज रक्कम : ४६२ कोटी रुपये

बिगर तारण कर्जदार : १४६२

कर्ज रक्कम : ३.३१ कोटी

तालुकानिहाय सावकारांची संख्या

अमरावती : २२९, भातकुली : ९ मोर्शी : ३२, अंजनगावसुर्जी : २३, धामणगावरेल्वे : २४, वरुड : ३३, अचलपूर : १३२, धारणी : १६, नांदगाव खंडेश्वर : १२, चांदूररेल्वे : ९, चांदूरबाजार : ३८, तिवसा : १८, दर्यापूर : १३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com