पुणे-नागपूर शिवशाही पार्सल प्रकरण: अखेर रहस्य उलगडलं; तीन बॉक्समध्ये आढळला लाखोंचा ऐवज

संतोष ताकपिरे 
Tuesday, 5 January 2021

ज्या कुरिअर बॉयने हे पार्सल नागपूर आगाराच्या शिवशाही बसमधून पुण्यावरून अकोला मार्गे अमरावती आणले. त्या दोघांविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.

अमरावती ः शिवशाही एस.टी. बसमध्ये ज्या  संशयास्पद पार्सल आढळल्या. त्या फ्रेजरपुरा पोलिसांनी जप्त केल्या. त्यात एकूण 60 किलो चांदी आणि 10 ग्रॅम सोन्याचे एक नाणे आढळले. शहरातील सराफा लाइनमध्ये मध्यरात्रीनंतर दीड वाजेपर्यंत या चांदीचे मोजमाप केल्या गेले.

जप्त ऐवज 41 लाख 59 हजार रुपयांचा असल्याचे पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी सांगितले. ज्या कुरिअर बॉयने हे पार्सल नागपूर आगाराच्या शिवशाही बसमधून पुण्यावरून अकोला मार्गे अमरावती आणले. त्या दोघांविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. तशी नोटीस बजावली. 

जाणून घ्या - अखेर वाघीण आणि बछड्यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडलं; शवविच्छेदनात पुढे आला धक्कादायक प्रकार

कोल्हापूरच्या पाच आणि राजकोट येथील दोन थोक सुवर्णकार व्यापाऱ्यांनी हा चांदीचा माल नागपूरच्या छोट्या व्यापाऱ्यांना पाठविला होता. ज्या व्यापाऱ्यांचा हा माल होता. त्यापैकी कोल्हापूर येथील एक सुवर्णकारासह, राधाकृष्ण कुरिअरचा संचालक हे दोघेही रविवारी (ता. तीन) फ्रेजरपुरा ठाण्यात दाखल झाले. पोलिसांनी त्या दोघांचेही बयाण नोंदविले. जो व्यापारी आज (ता. तीन) ठाण्यात दाखल झाला, त्याचा जप्त पार्सलमध्ये सहा ते साडेसहा लाखांचा माल होता. 

तो माल परत मिळावा, म्हणून काही देयकाच्या प्रती त्यांनी ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांना दाखविल्या. परंतु पोलिसांनी जप्त चांदी त्या व्यापाऱ्याला देण्यास नकार दिला. ज्या दोन कुरिअर बॉयला पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांना रविवारी (ता. तीन) रोजी सोडण्यात आले. कोल्हापूरच्या व्यापाऱ्यासह कुरिअर सर्व्हिसच्या संचालकांचे बयाण नोंदविले. 

अधिक वाचा - पुणे- नागपूर शिवशाहीत आढळलं संशयास्पद पार्सल; चालकानं बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

पोलिसांनी नियमानुसार कारवाई केली. ज्या व्यापाऱ्यांचा हा माल आहे त्यांना तो परत घेण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल. जप्त मालाचे मोजमाप झाले. त्याचे विस्तृत विवरण आयकर विभागाला पाठविल्या जाईल.
-पुंडलिक मेश्राम, 
पोलिस निरीक्षक फ्रेजरपुरा ठाणे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Silver of 41 Lacs found in Pune Nagpur Shivshahi bus in Amravati