तामिळनाडूतील नीट गैरव्यवहाराची पाळेमुळे महाराष्ट्रात 

medical college
medical college

अकोला : तामिळनाडूमध्ये नीट परीक्षेच्या हॉलतिकीटावर खऱ्या उमेदवाराच्या फोटोत बदल करून काही विद्यार्थ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. याप्रकरणाची पाळेमुळे महाराष्ट्रात पसरली असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे चेन्नई सीआयडी त्या तोतयागिरी करणाऱ्यांच्या मागावर असून, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची तपासणी करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक सी.विजयकुमार यांनी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई यांना दहा डिसेंबर रोजी दिले आहेत.


तामिळनाडू सीबीसीआयडी नीट परीक्षेमधील गैरव्यवहाराची चौकशी करीत आहे. काही विद्यार्थ्यांनी तामिळनाडू राज्यात नीट परीक्षेच्या हॉलतिकीटवर खऱ्या उमेदवाराच्या फोटोमध्ये बदल करून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविल्याचे पोलिस अधीक्षक गुन्हे अन्वेषण शाखा सीआयडी (साऊथ झोन) चेन्नई यांच्या तपासातून पुढे आले आहे. तामिळनाडूमध्ये तोतयागिरी करणारे ते विद्यार्थी महाराष्ट्रातील कुठल्यातरी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस किंवा वैद्यकीय पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रमाला शिकत असल्याचेही चेन्नई सीआयडीने नमूद करीत तोतयागिरी करणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या सीआयडी मागावर असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई यांना राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची तपासणी करण्याचेही चेन्नई गुन्हे अन्वेषण शाखा (सीआयडी)चे पोलिस अधीक्षक सी विजयकुमार यांनी कळविले आहे. यासंदर्भातील पत्र येथील जीएमसीला बुधवारी (ता.अठरा) प्राप्त होताच सदर विद्यार्थ्यांसंदर्भात चौकशी करण्यात आली. मात्र, संशयीत ते तोतयागिरी करणारे येथे प्रवेशित नसल्याचे सूत्रांकडून समजते.

महत्त्वाची बातमी -  स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या वैराग्याचे ऋणमोचन विकासाच्या प्रतीक्षेत! 

नोटीस बोर्डवर छायाचित्र प्रसिद्ध करा
तोतयागिरी करून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविणाऱ्या त्या विद्यार्थ्यांची छायचित्र तसेच नीट परीक्षा दिलेल्या केंद्रांची नावे तामिळनाडू सीआयडी कडून वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाला दहा डिसेंबर रोजी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्या विद्यार्थ्यांची राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूचना फलकावर छायाचित्र लावण्यात यावी, तसेच त्यांची ओळख पटल्यास पोलिस अधीक्षक सी.विजयकुमार यांना कळविण्याचे आदेश बारा डिसेंबर रोजी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई यांनी सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना दिले आहेत.

असे का घडले? - सोशल मीडिया करतोय सुखी संसाराचा 'काडीमोड'

या विद्यार्थ्यांवर आहे लक्ष
नीट सेंटर विद्यार्थ्यांचे नाव
 राजीव गांधी इंन्स्टीट्यूट उदित सूर्या
ॲण्ड टेक्नॉलॉजी अंधेरी (मुंबई, महाराष्ट्र)
बालभारती पब्लिक स्कूल (पारवाना रोड, दिल्ली) प्रवीण एस
स्वर्निम पब्लिक स्कूल (राजाजीपूरम, लखनऊ, उ.प्र.) राघल देवस
महादेव बिर्ला वर्ड ॲकेडमी (कोलकाता, पश्‍चिम बंगाल) प्रियंका
जवाहर विद्यामंदिर (दोरंडा रॉची, झारखंड) नाव उपलब्ध नाही केवळ फोटो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com