आजचा दिवस ऐतिहासिक! वर्ध्यातील बापू-कुटीच्या आदिनिवासात पहिल्यांदा दिला होता 'चले जाव' चा नारा..वाचा सविस्तर 

Today Mahatma Gandhi firstly gave slogan of Chale jaav
Today Mahatma Gandhi firstly gave slogan of Chale jaav

वर्धा : 'इंग्रजांनो चालते व्हा' हा महात्मा गांधी यांनी दिलेला नारा कोणताही भारतीय विसरू शकत नाही. देशात झालेल्या या आंदोलनाची मूळ रूपरेषा ठरली ती वर्ध्यातील सेवाग्रामच्या आश्रमात. यावेळी ब्रिटिशांच्या विरोधात जपान आणि सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेला भारतीयांनी सहकार्य करावे असे आवाहन सुभाषचंद्र बोस यांनी केले होते.

त्याच काळात स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या सेवाग्राम येथील आश्रमाच्या आदिनिवासात महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई यांच्यासह अनेक बड्या स्वातंत्र सैनिकांची यांची बैठक झाली. ब्रिटिशांना येथून हाकलण्यासाठी हा काळ योग्य असल्याचे म्हणत या बैठकीत 'चले जाव'चा नारा देण्यात आला.

थेट गाठली मुंबई 

या नाऱ्यानुसार आंदोलन करण्याची तारीख आठ ऑगस्ट ठरली. या तारखेला महात्मा गांधी यांना मुंबईला जाणार होते. आठ तारखेला मुंबई गाठण्यासाठी महात्मा गाधीं दोन दिवसांपूर्वी निघाले. निघण्यापूर्वी त्यांनी वर्ध्यातील लक्ष्मीनाराण मंदिरात दर्शन घेतले. येथून थेट रेल्वेस्थानकावर जात त्यांनी मुंबई गाठली. हा त्यांचा वर्ध्यातील वास्तव्याचा शेवटचा दिवस ठरल्याचे आश्रम प्रतिष्ठानचे जालंधरभाई यांनी सांगितले. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे अशा सूचना महात्मा गांधी यांनी दिल्या. या काळापर्यंत महायुद्ध भारताच्या दारावर येऊन पोहोचले होते.

इंग्रजांनो भारतातून चालते व्हा 

महायुद्धाचा काळात, ब्रिटीशांविरोधात असलेला रोष आणि महात्मा गांधी यांनी दिलेला इशारा यामुळे देश पेटून उठला होता. याच काळात महात्मा गांधी मुंबईत पोहोचले. यात 8 ऑगस्टला मुंबईच्या गवालिया टॅंकवर कॉंग्रेसचे महाअधिवेशन भरले. त्यात इंग्रजांनो भारतातून चालते व्हावे असा ठराव पारीत करण्यात आला. यावेळी महात्मा गांधी यांनी त्यांच्या भाषणात आता प्रत्यक्ष कृतीची वेळ आली आहे असे संबोधित केले. 

 'करू किंवा मरू' 

या क्षणापासून 'आपण कुणाचे गुलाम नाही, स्वतंत्र झालो' असे वागण्याचा सल्ला त्यांनी दिला. शिवाय 'करू किंवा मरू' हा मंत्र प्रत्येकाने आपल्या हृदयावर कोरून ठेवण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. त्या रात्री सर्व साथीदारांचा मुक्‍काम बिरला हाउस मध्ये होता. यावेळी महात्मा गांधी यांच्या कस्तुरबा गांधी, महादेवभाई होते. यावेळी महात्मा गाधींना अटक होईल अथवा नाही याबाबत चर्चा सुरू होती. झाले तसेच दुसऱ्या दिवशी अखेर महात्मा गांधी यांच्या नावे अजब पद्धतीने वॉरंट आला आणि त्यांना अटक झाली. पण तोपर्यंत चले जाव आणि भारत छोडो हे आंदोलन अख्या देशभर पसरले  होते.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com