

Umarkhed Explosion Case
esakal
उमरखेड (जि. यवतमाळ) : येथे शनिवारी (ता. २६) झालेल्या भीषण स्फोटात रविवारी (ता. २७)अनेक बाबी समोर आल्या आहेत. कोणत्याही परवानगीशिवाय घातक अशी स्फोटके बाळगण्यात येत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
हे स्फोटके पुरवठादार बळीराम नरवाडे यांच्याकडून खरेदी करून आणल्याचे सांगितल्याचे नमूद आहे. ट्रॅक्टर मालक व चालकाकडे स्फोटके बाळगण्याचा अथवा वापरण्याचा आवश्यक परवाना नसताना स्फोटके ट्रॅक्टरमध्ये ठेवून त्यांची निष्काळजीपणे हाताळणी करण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले.
या प्रकरणी पोलिसांच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गौरव कायंदे पाटील करीत असून पुढील तपासात स्फोटकांचा स्रोत, त्यांची वाहतूक, साठवणूक तसेच संबंधित परवान्यांची माहिती तपासली जात आहे.
या घटनेप्रकरणी ब्लास्टिंग ट्रॅक्टरचा मालक अप्पाराव माधवराव बोक्से (वय ५५, रा. बाळदी), चालक मृत वैभव अप्पाराव बोक्से (वय २ं०, रा. बाळदी) आणि स्फोटकांचा पुरवठा करणारा बळीराम नरवाडे (वय ५०, रा. ढाणकी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने बळीराम नरवाडे याला एक तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
ढाणकी रोडवरील जाकीर हुसेन वॉर्ड परिसरात दगडांमध्ये ब्लास्टिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना स्फोट होऊन चौघांचा मृत्यू, तर दहा जण जखमी झाले. ही भीषण घटना शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली.या घटनेत चार लोकांना मृत्यू झाला तर दहाजण जखमी झाले.
अविनाश बेले, साजेब खान अनिस खान, वैभव बोक्से व शेखा जावेद शेख बाबू अशी मृतांची नावे आहेत. तर दहापेक्षा अधिक व्यक्ती जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान रविवारी (ता. २७) या घटनेतील उमरखेड येथील दोन व बाळदी येथील दोघांवर शोकाकूल वातावरणात उमरखेड व बाळदी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले, पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.