अकोला : 'वंचित'ने लावले रस्त्यांवरील खड्ड्यामध्ये 'कमळ'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

तात्पुरती मलमपट्टी करून हे खड्डे बुजविण्याचे प्रकार सत्ताधारी करत असल्याने वंचित बहुजन आघाडीने एक आगळा वेगळा उपक्रमच या खड्ड्यांवर राबविला आहे.    

अकोला : महाराष्ट्र आणि खड्डे हे समीकरण तसं जुनंच. या सरकारने चांगले रस्ते तयार केले नाहीत, म्हणून जनतेने दुसऱ्यांना संधी दिली. मात्र, त्यांनीही त्यांचीच री ओढण्याचे प्रकार काही कमी झालेले नाहीत. सत्तेतील भाजप-सेना सरकारनेही रस्त्यांच्या बाबतीत घेतलेली दखल रस्त्यांची परिस्थितीत भर टाकू शकली नाही.

- अयोध्याप्रकरणाचा निकाल दृष्टीक्षेपात; पाहा कधी लागू शकतो निकाल

पावसाळा आला की रस्त्यांवरील खड्ड्यांचे तळे झाल्याचे चित्र सर्वत्र दिसते. मात्र, तात्पुरती मलमपट्टी करून हे खड्डे बुजविण्याचे प्रकार सत्ताधारी करत असल्याने वंचित बहुजन आघाडीने एक आगळा वेगळा उपक्रमच या खड्ड्यांवर राबविला आहे.    

- मंत्रालयात दोघा शिक्षकांचा आत्महत्येचा प्रयत्न

अकोला महानगरातील रस्ते बांधनीचा दर्जा 50% आला असून सोशल ऑडिटला भाजपने केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे उर्वरित रस्त्यांची कामे दर्जाहीन सुरू असल्याच्या विरोधात 'वंचित बहुजन आघाडी' जिल्हा कार्यकारिणीने बुधवारी (ता.18) स्कायलार्क हॉटेल समोरील सिमेंट रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांत 'कमळा'ची फुले लावून भाजपचा निषेध केला. यावेळी सोशल ऑडिटवर कारवाई करण्याचे तसेच रस्ते बांधकाम दर्जेदार करण्याची मागणीही केली.

- Vidhan Sabha 2019 : आ. भरणेंना दणका; पक्षातूनच उमेदवारीला विरोध

जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या नेतृत्वात ह्या आंदोलनात यावेळी प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, दिनकर वाघ, प्रभाताई शिरसाट, सम्राट सुरवाडे, शोभाताई शेळके, सागर कढोणे, आकाश शिरसाट, साबिर भाई, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे यांची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vanchit Bahujan Aaghadi agitated against the BJP government in Akola for constructing bad roads