esakal | ‘वाया’ पिकाला यंदा भावच नाही
sakal

बोलून बातमी शोधा

kham ph 5.jpg

अक्षया तृतीयेच्या पूजनाकरिता महत्त्व असलेल्या ‘वाया’ चे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा लॉकडाउनमुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. तालुक्यातील वानखेड येथील काही शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून गत दोन वर्षांपासून बाजारात मागणी नुसार पीक घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पारंपारिक पीक घेण्यापेक्षा नगदी उत्पन्न देणारी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अक्षया तृतीयेला बाजारात ‘वाया’ घेण्याचे ठरविले. मात्र, कोरोनामुळे सण-उत्सवावर सावट आल्याने, शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले

‘वाया’ पिकाला यंदा भावच नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : अक्षया तृतीयेच्या पूजनाकरिता महत्त्व असलेल्या ‘वाया’ चे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा लॉकडाउनमुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. तालुक्यातील वानखेड येथील काही शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून गत दोन वर्षांपासून बाजारात मागणी नुसार पीक घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पारंपारिक पीक घेण्यापेक्षा नगदी उत्पन्न देणारी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अक्षया तृतीयेला बाजारात ‘वाया’ घेण्याचे ठरविले. मात्र, कोरोनामुळे सण-उत्सवावर सावट आल्याने, शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले.

हेही वाचा- शेतकरी राजा...घे स्वतःची काळजी

ग्रुप तयार करून केली शेती
‘वाया’ वनस्पती पिकाला घागर पूजनासाठी चांगली मागणी असते. ही बाजू हेरून भगवान हागे, कैलास हागे, दीपक हागे, गोपाल धुळे, देवानंद हागे, गजानन दामधर या सहा शेतकऱ्यांनी ग्रुपने प्रत्येकी अर्धा एकर ‘वाया’ ची लागवड केली. अगोदर दोन-तीन लोकांनी प्रायोगिक तत्वावर हे पीक लागवड केली. बाजारातील मागणी पाहता यामध्ये शेतकरी वाढत आहेत. परंतु, यंदा ऐन अक्षय तृतीयेच्या वेळी कोरोनामुळे लॉकडाउन सुरू असल्याने बाजारात पिकाचे भाव पडले आहेत. दरवर्षी पेक्षा अर्ध्या भावात ‘वाया’ विक्री करावा लागला. बाजार पेठ पूर्णपणे सुरू नसल्यामुळे माल विक्री करायला अडचण येत आहे. परिणामी मागच्या वर्षीपेक्षा 50 ते 60 टक्के भाव कमी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. असे असले तरी शेती शिवाय पर्याय नाही. एकाच पिकाचे मागे न लागता बदलते पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांनी उत्पादन आणि विक्रीच्या दृष्टीने ग्रुप पद्धतीचा अवलंब केल्यास फायदा होणार असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. 

loading image