गाव प्रवेश बंदी; वाचा कुठे घडला प्रकार

sirso bandi.jpg
sirso bandi.jpg

सिरसो (जि. अकोला) : तालुक्यातील सिरसो आणि खापरवाडा या दोन गावांमधील ग्रामस्थांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बाहेर गावाहून येणाऱ्यांना आजपासून गावबंदी केली आहे. गावात तसी दवंडीही देण्यात आली आहे. नागरिकांनी रस्त्यावर बैलगाड्या आडव्या केल्या तर काही ठिकाणी रस्त्यावर काटेरी झुडूप टाकण्यात आली आहे.

स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण
कोरोना महामारीविरुद्ध लढा अद्यापही जारी आहे. वाढता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता शहराकडून नागरिक गावाकडे येत आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांची वैद्यकीय तपासणी सुद्धा आरोग्य विभागाडून केली जात आहे. असे असले तरी बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भविष्यात त्यांच्यापासून उद्भवणार संसर्ग लक्षात घेता बाहेरगावावरून येणाऱ्यांना सिरसो व खापरवाडा येथे प्रवेश नाकारला जात आहे.

21 एप्रिल पर्यंत गावात प्रवेश बंदी
कोरोना विषाणूचा फैलाव टाळण्यासाठी सिरसो व खापरवाडा येथील ग्रामस्थांनी गांभीर्य ओळखून इतरांना गावात प्रवेश न करू देण्याचा निर्णय घेतल्याचे दोन्ही गावाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सिरसोच्या सरपंच जयश्री मेहरे व खापरवाड्याच्या सरपंच संगीता सरोदे यांनी पुढाकार घेऊन आपापल्या गावांच्या प्रवेश द्वाराजवळ बैलगाड्या आडव्या करून व काट्या टाकून बाहेरून येणाऱ्यांना गावात मज्जाव केला. नातेवाईक, फेरीवाले, व्यावसायिकांना 21 एप्रिल पर्यंत गावात प्रवेश देऊ नये, अशी दंवडी दोन्ही गावात देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी गावातील नागरिक एकवटल्याचे दिसून येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com