Video : चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावाला हवी ‘डायनोसरचे गाव’ ही ओळख, अशी सुरू आहे धडपड

बालकदास मोटघरे-नीलेश झाडे
Tuesday, 8 September 2020

टेकडीवर आणि परिसरात शाकाहारी डायनोसरचे जिवाश्म आढळले आहेत. ज्युरासिक काळात अस्तित्वात असलेल्या आज नष्ट झालेल्या जलचर प्राण्यांचे जिवाश्म येथे आढळून आले आहेत. येथे सापडलेल्या जिवाश्मात कवट्या, कशेरूक, हातापायांची हाडे, चिलखती चखल्या, दात व विष्ठा यांचा समावेश आहे.

वरोरा (जि. चंद्रपूर) : ज्युरासिक काळात चंद्रपूर जिल्ह्याच्या भुभागावर महाकाय डायनोसरचे राज्य होते. भौगोलिक उलथापालथ झाली अन हे जीव भुगर्भात दफन झालेत. चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावाचा उदरात निपचित पडलेले डायनासोरचे जिवाश्म प्रकाशात आलीत. आता आपल्या गावाची ओळख ‘डायनोसरचे गाव’ व्हावे यासाठी गाव झटत आहे. जगाला या गावाची ओळख आहे. मात्र, जिल्ह्याला गावाचा विसर पडला आहे. त्या गावाचे नाव आहे...

करोडो वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर महाकाय डायनोसरच्या विविध प्रजातींच राज्य होते. हे महाकाय जीव पृथ्वीतलावरून कसे नष्ट झाले याचे कुतूहल संशोधक आणि सर्वसामान्यांनाही आहे. ज्युरासिक पार्क, ज्युरासिक व्हर्ड सारख्या सिनेमांनी डायनोसर बाबतची उत्सुकता वाढवली आहे. ज्युरासिक काळात चंद्रपूर जिल्ह्याच्या भागावर महाकाय डायनोसरचे राज्य होते.

अवश्य वाचा - अविश्वसनीय! विदर्भातील या गावात चक्क डायनासोर द्यायचे अंडी: काही वर्षांपूर्वी सापडले होते अवशेष

याचे पुरावे सन १८६५ मध्ये ब्रिटिशांना गवसले. डायनोसरचे जिवाश्म सापडणारी भारतातील दुसरी मोठी साईट चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या पिजदुरा येथे आहे. वरोरा तालुक्यात येणारे हे गाव तालुक्यापासून १४ कि.मी. अंतरावर आहे. गावाला लागूनच असलेल्या टेकडावर डायनोसरचे जिवाश्म विखुरले होते.

या टेकडीवर आणि परिसरात शाकाहारी डायनोसरचे जिवाश्म आढळले आहेत. ज्युरासिक काळात अस्तित्वात असलेल्या आज नष्ट झालेल्या जलचर प्राण्यांचे जिवाश्म येथे आढळून आले आहेत. येथे सापडलेल्या जिवाश्मात कवट्या, कशेरूक, हातापायांची हाडे, चिलखती चखल्या, दात व विष्ठा यांचा समावेश आहे.

हेही वाचा -  पितृपक्ष : ना गाय, ना श्वान श्राद्ध केले की कावळ्यालाच देतात नैवेद्य.. पण का? जाणून घ्या शास्त्रीय कारण

आम्हचे गाव, डायनोसारचे गाव!

पिजदुरा येथे सापडणाऱ्या डायनोसरच्या जिवाश्माचा अभ्यास करण्यासाठी परदेशी अभ्यासक, संशोधक गावात यायचे. महिनाभर ते गावात थांबायचे. गावातील मुलांना घेऊन परदेशी अभ्यासक टेकडीवर जिवाश्म गोळा करायचे. टेकडीवर सापडणारा दगड बहुमूल्य असल्याचे गावाने ओळखले. ज्या डायनोसरच्या जिवाश्मामुळे आपल्या गावाचे नाव सातासमुद्रापार गेले तीच आपल्या गावाची ओळख व्हायला हवी, असे गावकऱ्यांनी ठरविले. गावाने तसे प्रयत्नही चालविले आहेत. आता तर पिजदुरा ग्रामपंचायतेने लेटर पॕडवर डायनोसरचे चित्र छापले आहे.

अधिक माहितीसाठी - .. तर विदर्भात महापूर आलाच नसता.. महापुराला जबाबदार कोण? ऐतिहासिक विसर्ग करण्याची खरंच गरज होती का?

जिवाश्म गेले कुठे?

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेकडीवर आणि परिसरात डायनोसरचे मोठ्या आकाराचे जिवाश्म सापडत होते. अभ्यासासाठी आलेल्यांनी येथील जिवाश्म सोबत नेले. आज पुष्ठभागावर जिवाश्म नसल्यातच आहेत. येथील ग्रामपंचायत कार्यालयात डायनोसरच्या मांडीचे जिवाश्म ठेवले आहे.

...तर पिजदुऱ्यात ज्युरासिक पार्क

पिजदुऱ्यात ज्या भागात डायनोसरचे जिवाश्म आढळून आले आहेत, त्या भागाचे उत्खनन केल्यास डायनोसरच्या विविध प्रजातींचे जिवाश्म आढळण्याची शक्यता आहे. येथे सापडणाऱ्या जिवाश्मांचे संवर्धन करण्यासाठी सरकारने पिजदुरा गावातच ज्युरासिक पार्कची निर्मिती करावी, अशी गावकऱ्यांची एकमुखी मागणी आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A village in Chandrapur district wants to be known as the village of dinosaurs