esakal | कसली ही फॅशन... वाघनखांपासून बनवायचे होते लॉकेट, प्रकार आला उघडकीस आणि
sakal

बोलून बातमी शोधा

The villager who went to renew the locket from the tiger claw was burnt

वनपाल खनके व वनरक्षक मरसस्कोल्हे यांनी लगेच ग्रामसेवक संजय कुंटावार याला ताब्यात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय चिचपल्ली येथे नेले. चौकशीत त्याने वाघ नखाच्या तस्करीची माहिती दिली असता वन​विभागाने वनकायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

कसली ही फॅशन... वाघनखांपासून बनवायचे होते लॉकेट, प्रकार आला उघडकीस आणि

sakal_logo
By
विनायक रेकलवार

मूल (जि. चंद्रपूर) : सरकारने वन्यप्राण्यांच्या शिकारीवर बंदी घातली आहे. तसेच वन्यप्राण्यांचे अवयव सोबत बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही प्राण्याची शिकार केल्यात संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येतो. यामुळे काही प्रमाणात शिकारीवर आळा बसला आहे. यामुळेच विदर्भातील वाघांची संख्या चांगलीच वाढली आहे. असे असले तरी अधून-मधून वन्यप्राण्यांची शिकार होतच असते. चक्‍क वाघाची शिकार केल्यानंतर त्याच्या नखापासून लॉकेट तयार करण्यासाठी गेलेल्या इसमाला वन अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय माधव कुंटावार हा चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात राहतो. २००५ मध्ये तो गडचिरोली जिल्ह्यातील बिनागुंडा येथे ग्रामसेवक पदावर कार्यरत होता. त्यावेळी त्याने एकाला घरकुलाचे आमिष देत वाघ नखे मिळविली होती. तेव्हापासून त्याने ती वाघनखे सांभाळून ठेवली होती. वाघ नखांना प्रचंड मागणी आहे, हे विशेष...

हेही वाचा - ‘ते’ पाच मृतदेह पाहून गहिवरले वडगावचे अख्खे शिवार, थरथरल्या हातांनी केले सामूहिक अंत्यसंस्कार...

या वाघनखापासून गळ्यात घालण्यासाठी लॉकेट तयार करण्याचा विचार त्याच्या मनात आला. यामुळे सोमवारी वाघ नखांपासून लॉकेट बनविण्यासाठी संजय मूल येथील क्रिष्णकांत विठ्ठल कत्रोजवार या सुवर्णकाराच्या दुकानात गेला होता. एका वन्यजीव प्रेमीला माहिती मिळताच त्याने लगेच वनविभागाला कळविले.

वनपाल खनके व वनरक्षक मरसस्कोल्हे यांनी लगेच ग्रामसेवक संजय कुंटावार याला ताब्यात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय चिचपल्ली येथे नेले. चौकशीत त्याने वाघ नखाच्या तस्करीची माहिती दिली असता वन​विभागाने वनकायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक वनसरक्षक एस. एल. लखमावाड यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजुरकर करीत आहेत.

अधिक माहितीसाठी - ...आणि बहिणींची इच्छा अपूर्णच राहिली, भावावर काळाचा घाला; अपघातात अकाळी मृत्यू

वाघनखांना प्रचंड मागणी

वाघांच्या नखांना बाजारात मोठी मागणी आहे. या नखांमुळे धनलाभ होते असे म्हणतात. हे कितपत सत्य आहे माहिती नाही. मात्र, याच नखांसाठी आजवर वाघांची शिकार केली होती. यामुळे देशातच वाघांची संख्या कमी झाली होती. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कायदा अंमलात आणण्यात आला आहे. तरीही शिकार होतच आहे.

वनकोठडीनंतर जामिनावर सुटका

वाघ नखापासून गळ्यात घालायला लॉकेट बनविण्यासाठी सुवर्णकाराकडे आलेला ग्रामसेवक संजय याला वन अधिकाऱ्यांनी अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची वनकोठडी सुनावल्यानंतर त्याची बुधवारी जामिनावर सुटका केली. वाघाच्या तस्करीचे धागेदोरे गडचिरोली जिल्हातील भामरागड तालुक्यात असल्याने वनविभागाने त्या दिशेने चौकशी सुरू केली आहे.

क्लिक करा - पैशाचे आमिष दाखवून तो चक्क ४० वर्षीय विवाहितेला म्हणाला... वाचा सविस्तर

वन्यजीवाचे अवयव बाळगणे हा गुन्हा
कोणीतरी वाघनख घेऊन येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली. सदर प्रकरण भामरागड रेंजकडे सोपवण्यात येईल. याचा तपास सुरू केला आहे. वन्यजीवाचे अवयव बाळगणे हा गुन्हा आहे. १९७२ पासून हा वन्य जीव संरक्षण कायदा लागू आहे. ताब्यात घेण्यात आलेला नख फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.
- वैभव राजूरकर,
वनपरिक्षेत्र अधिकारी, चिचपल्ली, चंद्रपूर

संपादन - नीलेश डाखोरे