..आणि त्या मातेने आपल्या बाळाला सोडले समाजकल्याण उपायुक्तांच्या कक्षात.. असे का घडले? वाचा 

woman put her baby on the table deputy commissioner
woman put her baby on the table deputy commissioner

अमरावती : भविष्यनिर्वाह निधी कार्यालयातर्फे प्रसूतीचा खर्च मिळत नसल्याने एका महिलेने आपली सहा महिन्यांची नवजात मुलगी समाजकल्याण विभागाच्या अमरावती प्रादेशिक कार्यालयात आणून सोडल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत घडल्याने चांगलीच खळबळ उडाली.

प्रीती कडू (रा. अमरावती) या समाजकल्याण विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहात काम करतात. या विभागातर्फे पुणे येथील एका कंपनीला कामगार पुरविण्याचा कंत्राट देण्यात आला आहे. प्रीती यांनी प्रसूतिरजा पूर्ण झाल्यानंतर परत कामावर रुजू होताना नियमानुसार प्रसूतीचा खर्च कार्यालयाकडे मागितला. मात्र, त्यांना पीएफचे पैसे कार्यालयात भरले नसल्याने तुम्हाला पैसे मिळू शकत नाहीत, असे उत्तर भविष्यनिर्वाह निधी कार्यालयातर्फे देण्यात आले. 

मात्र त्याच वेळी संबंधित कंपनी आणि अमरावतीच्या समाजकल्याण विभागातर्फे पैसे भरले असल्याचे प्रीती कडू यांना सांगण्यात आले. दोन्ही कार्यालयांकडून होत असलेली हेळसांड आणि आर्थिक विवंचना यामुळे त्रस्त होऊन कडू दाम्पत्याने आपली सहा महिन्यांची चिमुरडी प्रादेशिक उपायुक्तांच्या कक्षातील टेबलवर आणून ठेवली आणि यापुढे या बाळाचे पालनपोषण आपल्याला शक्‍य नसल्याने समाजकल्याण विभागानेच ते करावे, अशी मागणी केली.

शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी उपायुक्त कार्यालयात याबाबत विचारणा केली असता त्यांनाही संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे पैसे पीएफ कार्यालयात जमा केले असल्याचे सांगितले. दरम्यान, याबाबत समाजकल्याण उपायुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com