विहिरीत सापडलेल्या अज्ञात मृतदेहामुळे विविध प्रश्न उपस्थित...

सचिन शिंदे
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

तरुणाचा मृतदेह असल्याने अनेक चर्चेला उधाण...

आर्णी : तालुक्यातील लोणबेहळ येथिल शेतातील विहिरीत तरूणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना आज (सोमवार, ता. 28 रोजी) दुपारी 1 वाजता उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

नागपूर - तुळजापूर हायवेवरील लोणबेहळ येथील प्रशांत काळे यांच्या शेतात असलेल्या विहिरीत एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी पाणीपंप सुरू केल्याने विहिरीतील पाण्याचा उपसा झाला. त्यामुळे आतमध्ये  दोन्ही पाय मोठ्या दगडाला बांधून असलेला सुंदर दिसणाऱ्या तरूणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरल्याने विविध प्रकारची चर्चा गावात होऊ लागली.

आत्महत्या आहे का कोणी मारून टाकले आहे हे सांगणे कठीण असून मृतकाची ओळख झाल्यावरच घटना कळू शकेल. घटनेची माहिती आर्णी पोलिस स्टेशनला दूरध्वनीवरून दिली असून पोलिस घटनास्थळी पोचेपर्यंत बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
फासावर जाईन, पण भाजपशी समझोता नाही- लालू प्रसाद यादव
पुणे: नारायणगावजवळ एसटीला अपघात; 8 जणांचा मृत्यू
तिसऱ्या सामन्यासह भारताचा मालिका विजय
सिंधूचे सुवर्ण स्वप्नभंग
शिवसेनेच्या नाराजांना मुख्यमंत्र्यांचे 'गाजर'
भाजप म्हणजे खरेदी-विक्री संघ! - अशोक चव्हाण
'कह दू तुम्हें' वापरण्यास बादशाहोला अंतरिम मनाई

Web Title: yavatmal news arni taluka murder dead body in well