Maharashtra Weather Update: राज्यभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा | Rain Alert

Monsoon Updates: राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा कायम; सिंधुदुर्ग व कोल्हापूर घाटमाथ्यावर रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाट आणि कोल्हापूर शहराला यलो अलर्ट जारी करत हवामान विभागाची नागरिकांना सतर्कतेची सूचना..

राज्यात पावसाचा जोर आजही कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. अनेक भागांत मुसळधार पावसासोबत वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान खतर्याची पातळी गाठत आहे. हवामान विभागाने सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्याला रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे या भागांतील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाट आणि कोल्हापूर शहराला यलो अलर्ट देण्यात आला असून, या ठिकाणीही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने प्रवाशांनी आणि नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन केलं असून, विशेषतः नदीनाल्यांच्या आसपास राहणाऱ्यांनी सतर्क राहावं, असं स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com