Pahalgam Terror Attack वर PM Narendra Modi यांचा अतिरेक्यांना इशारा | Marathi News

PM Narendra Modi on Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा कठोर इशारा, “दहशतवाद्यांना कल्पनेपलीकडची शिक्षा मिळेल, उरलेली ठिकाणंही धुळीस मिळवू”

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना स्पष्ट आणि कठोर इशारा दिला आहे. बिहारमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “निष्पाप पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्यांना अशा प्रकारची शिक्षा दिली जाईल, जी त्यांनी स्वप्नातही विचारली नसेल. दहशतवाद्यांची उरलेली ठिकाणंही आता धुळीस मिळवण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छा शक्ती दहशतवाद्यांचं कंबरडं मोडल्याशिवाय थांबणार नाही.” अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरोधात जगभरात महत्त्वाचा संदेश दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com