संभाजीनगरमध्ये ठाकरेंना धक्का, २४ तासात जिल्हाप्रमुख फोडला | Chhatrapati Sambhajinagar Abdul Sattar | Sakal News

Chhatrapati Sambhajinagar Abdul Sattar: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीआधी राजकारणात मोठा भूकंप; उद्धव ठाकरे गटाचे ग्रामीण जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोडांचा पक्षाला जय महाराष्ट्र, थेट शिंदे शिवसेनेत प्रवेश; राजीनाम्यानंतर लगेचच कन्या मोनाली राठोड यांना आमखेडा सर्कलमधून उमेदवारी..

Abdul Sattar: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रामीण भागाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या राजकीय बदलामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना जोर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com