New Education Policy: आता दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fact check

New Education Policy: आता दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द?

2020 साली आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या जात असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. सोशल मीडियावर एक मॅसेज व्हायरल होत असून त्यात नवीन शैक्षणिक धोरणानुसार दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या जात असल्याचे सांगितले. सोबतच एमफिलहीसुद्धा बंद होणार, असे या मॅसेजमध्ये म्हटले.

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर आज ३६ वर्षांनंतर देशात नवे शैक्षणिक धोरण लागू झाले असल्याचे या मॅसेजमध्ये म्हटले. भारत सरकार यांचा हवाला देत हा मॅसेज जोरदार व्हायरल होत आहे. मात्र यावर पीआयबीने हा मॅसेज खोटा असल्याचा सांगितले. पीआयबीने आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन ही माहिती दिली. (according to new education policy 10th board exam will be closed?)

पीआयबीने ट्वीट करत सांगितले की हा दावा खोटा आहे. "नवीन शैक्षणिक धोरणात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची तरतूद नाही. कृपया असे दिशाभूल करणारे संदेश फॉरवर्ड करू नका." असे आवाहन पीआयबीने केले. यासोबतच PIB ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शी संबंधित लिंक देखील शेअर केली आहे.

Web Title: According To New Education Policy 10th Board Exam Will Be Closed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top