Created By : Newsmeter
Translated By: Sakal Digital Team
हैदराबाद : काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी जुन्या संसद भवनाच्या पायऱ्यांवरून खाली उतरताना कारमध्ये बसण्यापूर्वी मीडियाशी बोलत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.
व्हिडिओसोबत दिलेल्या कॅप्शनवरील हिंदी मजकुराचा अनुवाद असा होतो, हा काँग्रेसचा खरा चेहरा आहे, भारत माता हा त्यांच्यासाठी आता असंसदीय शब्द आहे.
मात्र हा व्हिडीओ, जेव्हा एका पत्रकाराने राहुल गांधींना काँग्रेस नेत्याच्या भाषणातील काही भाग सभागृहातील चर्चेदरम्यान काढून टाकल्याबद्दल विचारले तेव्हा राहुल उत्तर देतानाचा आहे. “वरवर पाहता, भारत माता हा आजकाल भारतामध्ये असंसदीय शब्द आहे.”
एका X युजरने व्हिडिओ शेअर करत दावा केला आहे की, राहुल गांधी 'भारत माता हे असंवैधानिक शब्द आहे' असे म्हणत आहेत. (संग्रहित लिंक तेथे पाहू शकता)