उन्हाळ्यात पेट्रोल टँक फुल केल्यास वाहनाचा स्फोट होतो?

या आधी २०१८ मध्ये अशा प्रकारचा मॅसेज व्हायरल झाला होता.
Fact Check
Fact Checksakal

उन्हाळ्यात वाहनात जास्त प्रमाणात इंधन भरल्याने वाहनांचा स्फोट होऊ शकतो, अशा आशयाचा एक मॅसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा मॅसेज इंडियन ऑइलच्या नावाने दिला जात असून सोशल मिडियावर हे खरं आहे की खोटं, यासंदर्भात पडताळणी करण्याची मागणी केली जात आहे. (Indian Oil warning people about possible explosion in fuel tanks of vehicles on filling fuel to the brim in summer)

Fact Check
आसारामच्या आश्रम आवारात कारमध्ये सापडला युवतीचा मृतदेह

सोशल मिडीयावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत इंडियन ऑइलचे ब्रँडिंग आणि हिंदीमध्ये मजकूर देण्यात आला आहे. या मजकूरात लोकांना उन्हाळ्यात जास्तीत जास्त संभाव्य मर्यादेपर्यंत इंधन टाक्या भरल्यास वाहनाच्या संभाव्य स्फोटाबद्दल चेतावणी देण्यात आली आहे. टाकी अर्धी भरून त्यातील गॅस बाहेर पडू द्या, असंही या मेसेजमध्ये सांगण्यात आलं.

या आधी २०१८ मध्ये अशा प्रकारचा मॅसेज व्हायरल झाला होता. तेव्हा इंडियन ऑइलने ट्विट करून स्पष्ट केले होते की कंपनीने असा कोणताही प्रकारचा सल्ला दिला नाही. हा मेसेज खोटा आहे.

Fact Check
बेंगळुरू : सहा शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, वाचा शाळांची यादी
Fact Check
बेंगळुरू : सहा शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, वाचा शाळांची यादी

इंडियन ऑइल देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी आहे सोबतच पेट्रोल-डिझेल च्या रिटेल सेलमध्ये देखील या कंपनीचे वर्चस्व आहे. त्यामुळे इंडियन ऑइल नागरिकांची पहिली पसंती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com