Viral Video : सीमा हैदरच्या सचिनवर 'लप्पूसा सचिन' गाणं सुद्धा बनलं, गाणं सोशल मीडियावर व्हायरल

सचिन मीना आणि सीमा हैदर हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय
VIDEO
VIDEO esakal

VIDEO : सचिन मीना आणि सीमा हैदर हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरले आहेत. कधी त्यांच्या प्रेमकथेची चर्चा होते तर कधी सीमा हैदर पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा संशय व्यक्त केला जातो. या प्रकरणी एटीएससह अनेक तपास यंत्रणांनी सीमा, सचिन आणि त्याच्या वडिलांचीही चौकशी केली आहे.

मात्र, याशिवाय सचिन-सीमाची चर्चा मुख्यतः त्यांच्या लव्हस्टोरी भोवती फिरते. सीमाचे अनेक डान्स व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. सध्या सीमा-सचिनवर बनवलेले एक गाणं चर्चेत आहे, जे सोशल मीडियावर येताच लोकांची हसता हसता पुरेवाट झाली आहे. तुम्हाला आठवत असेल, काही दिवसांपूर्वी सचिन मीणाच्या शेजारीन बाईने एक असं विधान केलं होतं जे प्रचंड चर्चेत आलं होतं. ज्याची लोकांनी मजा घेतली आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला.

VIDEO
Smartphone Tips : फोन रात्रभर चार्ज करणे योग्य की अयोग्य?

त्या शेजारीण बाई रागाने म्हणाल्या होत्या, "क्या है सचिन में? लप्पू सा तो सचिन है. मुंह से बोलना तो उसे आवे ना…बोलता तो वो है ना. झींगुर सा लड़का है. उससे प्यार करेगी वो?" आता या महिलेच्या या मजेशीर वक्तव्यावर गाणं सुद्धा बनलं. प्रसिद्ध संगीतकार यशराज मुखाटेने 'लप्पूसा सचिन' नावाचं एक गाणं तयार केलंय. गिटार वाजवताना त्याने स्वतः हे गाणं गायलं आहे आणि मध्येच सचिनच्या शेजारी राहणाऱ्या या महिलेचा डायलॉगही टाकला आहे, ज्यामुळे गाणं आणखीनच मजेदार बनलंय.

VIDEO
Vastu Tips : समस्या अनेक उपाय फक्त एक, भगवान शंकरांचा फोटो करेल तुमच्या अनेक समस्यांच निवारण!

हे मजेशीर गाणं ज्या कोणी ऐकलय त्याला हसू आवरणार नाही. यशराज मुखाटेने स्वतः हे गाणं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले असून आतापर्यंत 1.8 मिलियन म्हणजेच 18 लाख वेळा पाहिलं गेलंय. तर 1 लाख 86 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केलं आहे.

VIDEO
Driving Tips : चांगलं मायलेज हवंय? मग या गियरमध्ये चालवा कार? Perfect Driving साठी महत्वाच्या टिप्स

त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. कोणी म्हणतंय की 'हे विलक्षण आहे', तर दुसर्‍या युजरने लिहिलय 'देशाला जाणून घ्यायचं आहे, सचिनमध्ये असं काय आहे?'.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com