
टिकटॉकवर व्हिडीओ बनवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. प्रसिद्धीसाठी, टाईमपास म्हणून अनेकजण टिकटॉक व्हिडीओ बनवत असतात. पण, या तरुणाकडे पाहा. नको तो व्हिडीओ बनवण्याचं धाडस या तरुणाला महागात पडलंय.
आता याच्याकडे पाहा. टिकटॉक व्हिडीओ बनवत असताना यानं फावडं वर फेकलं आणि हा ऍक्टिंग करत होता. पण, वरती फेकलेलं फावडं याच्या डोक्यात पडलं. पुन्हा एकदा पाहा किती भयानक प्रकार घडलाय. फावडं याच्या डोक्यात पडल्यानं याला गंभीर इजा झाली.
हा व्हिडीओ आता व्हायरल होतोय. व्हिडीओ नक्की कुठला आहे ते कळू शकलेलं नाही. पण, असे व्हिडीओ बनवण्यासाठी नको ते धाडस केलं जातं. मात्र, असं धाडस जीवावर बेतू शकतं. या तरुणाच्या डोक्यात चार टाके पडल्याचं बोललं जातंय. त्यामुळं तुम्ही जर असे टिकटॉक व्हिडीओ बनवत असाल तर असे जीवघेणे स्टंट करू नका.
Desktop Headline:
Viral Satya : सोनसाखळी चोरांना महिलेनं दाखवला इंगा (Video)
Desktop Body:
एक महिला आणि तिची मुलगी सायकल रिक्षामधून उतरून घरी चालली होती. त्याचवेळी दोघे सोनसाखळी चोर बाईकवरून आले. महिलेच्या जवळ येताच बाईकचा वेग कमी केला आणि काय केलं पाहा. बाईकवर मागे बसलेल्या चोरानं महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढण्याचा प्रयत्न केला. सोनसाखळी ओढत असताना महिलेनं प्रसांगवधान दाखवल्यानं तिनं चोराचा हात पकडला आणि या चोराला बाईकवरून खाली पाडलं. चोराला पकडून ठेवल्यानं आजूबाजूचे लोकही जमा झाले. बघा, या चोराला या महिलेनं पकडून ठेवलं. पण, आपलंही काय खरं नाही म्हटल्यावर त्याचा साथीदार बाईक सोडून पळत होता. मात्र, या चोरालाही लोकांनी पकडून चांगलाच चोप दिला.
या दोन्ही चोरांना लोकांनी पकडून पकडून मारलं. जमावानं दोघांना बेदम चोप दिला. पुन्हा चोरी करताना हे दोघेही 100 वेळा विचार करतील अशीच शिक्षा या लोकांनी दिली. हे दोघेही चोर सराईत आहेत, चोरी करताना आपली ओळख कळू नये म्हणून डोक्यात हेल्मेट घातलंय. पण, महिलेच्या धाडसामुळं यांचा चोरीचा प्लॅन फसला आणि दोघेही लटकले. ही धक्कादायक घटना मागील महिन्यात घडलीय. पण, आता हा व्हिडीओ व्हायरल करून सोनसाखळी चोरांपासून सतर्क राहण्याचं पोलिसांनी आवाहन केलंय. त्यामुळं अशा सोनसाखळी चोरांपासून सावधगिरी बाळगा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.