

Created By: Boom Live
Translated and Edited by: Sakal Digital Team
पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की मोदींनी २०१४ पूर्वी ईव्हीएमपेक्षा बॅलेट पेपरला प्राधान्य दिले होते असे सांगणारा व्हिडीओ सध्या व्हायरल केला जात आहे.
एका 'एक्स युजर' ने एक्सवर (ट्विटर) व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच या व्हिडिओच्या वर लिहिलेल्या ओळीत त्या युजरने
'निवडणूका या 'ईव्हीएम' पेक्षाही 'बॅलेट पेपर' वर घेतल्या पाहिजेत'
'अमेरिकेतील लोकसुद्धा निवडणूका या 'ईव्हीएम' वर न घेता 'बॅलेट पेपर' वर घेतात'
- नरेंद्र मोदी २०१४ पूर्वी
अशा ओळी देत व्हिडीओ पोस्ट केला आहे.
फोटो सौजन्य : एक्स युजर
'व्हायरल व्हिडीओ' मध्ये मोदी काय म्हणतायेत?
आमचा देश गरीब आहे असुशिक्षित आहे, आमच्या लोकांना काही येत नाही.. बंधू आणि भगिनींनो.. अरे जगातील सुशिक्षित देशातील लोकं सुद्धा जेव्हा निवडणूका असतात तेव्हा ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मतदान करत नाहीत तर बॅलेट पेपरच्या मतदान करतात.
याची मूळ पोस्ट इथे तर संग्रहित पोस्ट इथे पाहू शकता.