BJP leaders Manohar Lal Khattar, Bhupender Yadav, and Shivraj Singh Chauhan in the race for national president position : मंगळवारी महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, तेलंगाना, उत्तराखंडसह ६ राज्यांच्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकूण २० राज्यांना नवे अध्यक्ष मिळाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे यासह राष्ट्रीय अध्यक्षासाठी लागणारा ५० टक्के कोरमही पूर्ण झाला आहे. त्यामुळे लवकरच भाजपाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
भाजपाकडून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी तीन नावं चर्चेत आहेत, यामध्ये मनोहर लाल खट्टर, भूपेंद्र यादव आणि शिवराज सिंह चौहान यांच्या समावेश आहे. तिघेही मोदी कॅबिनेटमध्ये मंत्री आहेत. अशात तिघांपैकी कुणी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यास त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर जावं लागणार आहे. तिन्ही नेत्यांना पक्ष पातळीवर काम करण्याचा दीर्घ अनुभव आहे.
मनोहरलाल खट्टर हे पंतप्रधान मोदी यांचे अगदी जवळचे मानले जातात. प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. याशिवाय भूपेंद्र यादव यांचे नावही चर्चेत आहेत, त्यांनाही दीर्घकाळ आरएसएस बरोबर काम करण्याचा अनुभव आहे. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केलं आहे.
याशिवाय शिवराज सिंह चौहान आणि मनोहरलाल खट्टर यांची नावंही चर्चेत आहेत. दोघांनाही मुख्यमंत्रीपदाचा अनुभव आहे. तसेच ते संघाशी जुळले आहेत. दरम्यान, अध्यक्षपदाबाबत अद्याप भारतीय जनता पक्षातील कोणताही नेता बोलायला तयार नाही. मात्र, पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर नव्या अध्यक्षाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
अशातच भारतीय जनता पक्षाचा नवा अध्यक्ष कोण होणार? याची उत्सूकता सर्वांना लागली आहे. भाजपाचा इतिहास पाहता, पक्ष नेहमीच अनपेक्षित नाव पुढे आणण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे मनोहर लाल खट्टर, भूपेंद्र यादव किंवा शिवराज सिंह चौहान यांच्याबरोबरच एखादे नवे नाव समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कुणाची निवड होणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.