प्रायमरची गरज! 

प्रायमरची गरज! 

मेकअप चांगला दिसावा आणि केलेल्या मेकअपपासून आपल्या त्वचेचे संरक्षण व्हावे, यासाठी मेकअप करण्यापूर्वी लावण्यात येणारा प्रायमर महत्त्वाची भूमिका बजावीत असतो. मेकअप करण्यापूर्वी आपली पूर्ण त्वचेचा चांगला बेस तयार करण्यासाठी प्रायमर मदत करते. 

१. मेकअप करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. त्यानंतर तो पूर्ण कोरडा करावा. अगदी थोडे प्राइमर हातावर घ्यावे किंवा त्याचे छोटे थेंब हनुवटी, कपाळ, डोळे, गाल नाक यांच्यावर लावावे व पूर्ण चेहऱ्यावर हाताच्या साह्याने पसरावेत. प्रायमर चेहऱ्याला जास्त चोळू नये. 

२. प्रायमर लावल्याने चेहऱ्याचा बेस स्मूथ होतो व त्यावरील खरबडीतपणा निघून जातो. त्वचेचा पृष्ठभाग एकसारखा होतो. त्यामुळे प्रायमरवर केलेला मेकअप अधिक खुलून दिसतो. 

३. अनेकदा काहींना ब्लॅक सर्कल किंवा उन्हात फिरल्याने चेहऱ्याचा स्कीनटोन एकसारखा राहत नाही. काहीवेळा कपाळ, नाक काळे पडलेले असते. खराब झालेला स्कीनटोन आपल्याला एका रात्रीत बदलता येत नाही. परंतु, तो झाकणे मात्र शक्य असते. प्रायमर तुमचा स्किनटोन एकसारखा ठेवण्यास मदत करते. 

४. तुम्ही सतत मेकअप करीत असल्यास किंवा हेवी मेकअप करीत असल्यास त्वचेची काळजी घेणे फार गरजेचे असते. अशावेळी प्रायमर तुमच्या त्वचेसाठी महत्त्वाचा ठरतो. 

५. मेकअप केल्यानंतर अनेकदा चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. पण तुम्ही प्राइमरचा वापर केला असल्यास सुरकुत्या झाकल्या जातात. त्यामुळे तुमचा चेहरा फुटत असल्यास प्राइमर लावणे गरजेचे आहे. 

६. थोडे वय झाल्यानंतर चेहऱ्यावर पोअर्समुळे बारीक बारीक खड्डे दिसू लागतात. हे बारीक खड्डे लांबून दिसणारे नसले, तरीही त्यामध्ये मेकअप जाऊन पुरळ येण्याची शक्यता असते. अशावेळी पोअर्सचा आकार कमी करून ते तात्पुरते बंद करण्याचे काम प्रायमर करते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com