ग्रुमिंग + : रिंग्स सेट : एकापेक्षा अनेक चांगले!

Rings-Set
Rings-Set

भारतीय संस्कृतीमध्ये दागिन्यांना खूप महत्त्व आहे. पोशाखाप्रमाणेच शृंगार करण्यासाठी दागिन्यांना वापर पूर्वीपासूनच आहे. दागिन्यांचा एक स्वतंत्र इतिहास आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. काळानुसार यामध्ये बदल झाले असले आणि भरपूर दागिने घालायची पद्धत कमी झाली असली, तरी क्रेझ कायम आहे. त्यामधील रोजच्या वापरातील आणि सर्रास वापरली जाणारी म्हणजे अंगठी होय. एक-दोन अंगठ्या आपण घालतोच, पण आता ट्रेंड काहीतरी वेगळेच सांगतोय. सध्या सर्वाधिक मागणी असणाऱ्या ‘रिंग्स सेट’विषयी अधिक माहिती...

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

1) पारंपरिक आणि वेस्टर्न दोन्ही लुकसाठी या सेटचा वापर करता येतो.
2) गोल्ड, सिल्व्हर आणि रोज गोल्ड हे रंग लोकप्रिय आहेत. 
3) रिंग सेटमधील आकार आणि डिझाईन खूप आकर्षक असतात. त्यामुळे रोजच्या अंगठीपेक्षा या सेटला एकदा नक्कीच ट्राय करावे. 

रिंग्स सेट
यामध्ये एक-दोन नाही तर भरपूर रिंग्सचा, अर्थात अंगठ्यांचा सेट आहे. यामध्ये तुम्हाला नऊ ते बारा अंगठ्या मिळतात. मग, त्या वेगवेगळ्या वापरायच्या का? तर नाही, एका बोटामध्ये तीन किंवा चार अशाप्रकारे तुम्ही सर्व बोटांमध्ये त्या घालायच्या. हा बोहेमियन स्टाईलचा प्रकार आहे. या सेटमध्ये तुम्हाला असंख्य प्रकार आणि विविधता पाहायला मिळेल. तुम्हाला इतक्या अंगठ्या वापरायच्या नसल्यास काही बेसिक सेटही मिळतात, ज्यामध्ये कमी रिंग्स असतात व त्यांचे डिझाईन साधे असते. ऑफिस, मीटिंग आदी ठिकाणी या सेटचा वापर करता येईल. सेटमधील रिंग्सचे आकारही वेगवेगळे असतात. त्यामुळे एका बोटामध्ये साधारण तीन ते चार रिंग्स घालता येतात.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com