Face Beuty चेहेऱ्याची त्वचा राखायची तर साबणाचा नका करु वापर

बाजारात काही कंपन्या अशा देखील आहेत. जे त्यांचा साबण चेहऱ्यासाठी देखील तितकाच प्रभावी असल्याचा दावा करतात.मात्र असं असलं तरी चेहऱ्यासाठी साबणाचा वापर हानिकारक ठरू शकतो
चेहेऱ्याची काळजी
चेहेऱ्याची काळजीEsakal

त्वचा ही आपल्या शरीरातील सर्वाच संवेदनशील भाग आहे. त्यामुळे त्वचेची काळजी घेणं गरजेचं असचं. त्यात खास करून चेहऱ्यावरील त्वचा ही जास्त नाजूक आणि कोमल असते. म्हणूनच चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी अनेक महिला वेगवेगळे स्किन केअर प्रोडक्ट Skin Care products आणि ब्युटी प्रोडक्टचा वापर करतात. Face Care Tips in Marathi Use Chemical Free Products for cleansing

तर काही महिला मात्र आंघोळ करताना आंघोळीचाच साबण चेहऱ्याला लावतात. खास करून अनेक ऑईली स्किन असलेल्या महिलांना साबणामुळे Soap तेलकटपणा नियंत्रणात राखता येईल असा समज असतो. तर बाजारात काही कंपन्या अशा देखील आहेत. जे त्यांचा साबण चेहऱ्यासाठी देखील तितकाच प्रभावी असल्याचा दावा करतात.मात्र असं असलं तरी चेहऱ्यासाठी साबणाचा वापर हानिकारक ठरू शकतो. साबणातील केमिकल्समुळे Chemicals चेहऱ्यावरील त्वचेवर विपरित परिणाम होवू शकतो.

१. चेहरा ड्राय होतो- चेहऱ्याची त्वचा ही अति सेंसिटिव्ह असते. तर साबण हे असं प्रोडक्ट आहे. ज्यात अनेक केमिकल्स वापरण्यात आलेले असतात. चेहऱ्यावर साबण लावल्याने या केमिकल्समुळे त्वचा कोरडी पडते. तसंच साबणात मोठ्या प्रमाणात ट्रिक्लोसन नावाचं रसायन वापरण्यात आलेलं असतं. या रसायनामुळे चेहऱ्याचं नैसर्गिक तेल नष्ट होवून चेहरा अधिक रुक्ष होतो. त्यामुळेच वेळीच चेहऱ्याला साबण लावणं थांबवणं गरजेचं आहे. Do not use soap on face

२. त्वचेच्या PH लेवलवर परिणाम- कोणत्याही त्वचेचा सामान्य Ph लेवल हा ४ ते ६५ इतका असू शकतो. मात्र सतत केमिकल्सचा वापर केल्याने याचं संतुलन बिघडू शकतं. त्यात अलिकडे बाजारात विविध साबण उपलब्ध होत आहेत. यातील अनेक साबणांमध्ये परफ्युम, डिटर्जंट आणि विविध केमिकल्सचा भडीमार असतो. यामुळे शरीर तर स्वच्छ होतंय मात्र यामुळे त्वचेला आतून इजा होते. तसंच साबणामुले त्वचेच्या pH लेवलवर परिणाम होतो. त्वचेचा pH लेवल योग्य असले तर बॅक्टेरियल इंफेक्शन आणि त्वचा ड्राय होण्याचा धोका कमी होतो. Soap Side Effects on Face

हे देखिल वाचा-

चेहेऱ्याची काळजी
Face Care : चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी घरीच तयार करा द्राक्षाचे हे ५ फेसपॅक

३. चेहऱ्यावरील ग्लो कमी होतो- एमिनो ऍसिड आणि क्षारांप्रमाणे असणाऱे काही घटक आपल्या त्वचेच रक्षण करतात. यामुळे चेहऱ्यावरील ग्लो टिकून राहण्यासही मदत होते. हे घटक त्वचेच्या थरावर नैसर्गिकरिच्या मॉइश्चरायजिंगचं काम करत असतात. मात्र नियमितपणे साबणाचा वापर केल्यास हे घटक नष्ट होवून जातात. तसंच साबणात अधिक प्रमाणात असेलले क्षारीय घटक जीवाणूंना नष्ट करण्याचं काम करत असले तरी यामुळे त्वचेचं मोठं नुकसान होतं. यामुळे त्वचेवरील चांगले बॅक्टेरिया देखील नष्ट होतात. 

४. पोर्स बंद होतात- कायम साबणाने चेहरा धुतल्यास तुमच्या चेहऱ्यावरील पोर्स बंद होवू शकतात. साबणाच्या नियमित वापरामुळे साबणातील फॅटी ऍसिड पोर्समध्ये जाऊन जमा होतात. यामुळे पोर्स बंद होवून पिंपल्सची समस्या निर्माण होवू शकते. एवढचं नव्हे तर साबणाच्या वापराने ब्लॅकहेडस् आणि व्हाईटहेडस् वाढण्याची शक्यता निर्माण होते. soap side effects 

५. त्वचेवरील सुरकुत्या वाढतात- साबणामुळे चेहऱ्यावरील त्वचा ड्राय होण्यासोबतच चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात. यामुळे चेहऱ्यावर एजिंगची लक्षण दिसू लागतात. सुरकुत्या आणि ड्रायनेसमुळे जास्त वय दिसू लागतं. त्यामुळे चेहऱ्यासाठी साबण वापरणं योग्य नाही. 

चेहरा स्वच्छ करण्यासाठी टिप्स

- तुम्ही चेहरा धुण्यासाठी एखादं हर्बल फेसवॉश वापरू शकता.

- जर तुम्हाला घरगुती पद्धतीने बिना केमिकल चेहरा धुवायचा असेल तर तुम्ही गुलाब पाण्याचा वापर करु शकता. हे त्वचेसाठी फायदेशीर ठरेल. यासाठी तुम्ही चेहऱ्यावर गुलाब पाण्याचा स्पे मारुन चेहरा स्वच्छ कापडाने पुसू शकता. Skin care routine 

- तुम्हाला चेहऱ्यावरील ग्लो टिकवून ठेवायचा असले तर तुम्ही घरात असलेल्या कच्च्या दूधाचा चेहरा साफ करण्यासाठी वापर करू शकता. यामुळे त्वचेसंबधी अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. यासाठी एक कापसाचा बोळा कच्च्या दुधात भिजवून घ्या. हा बोळा चेहऱ्यावर फिरवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. कच्च दूध तुमची त्वचा मऊ ठेवण्यास मदत करेल. Raw milk for face wash

- हळद आणि मधाचा फेसपॅक लावून तुम्ही चेहरा स्वच्छ धुवू शकता.

- तसचं तुम्ही मुलतानी मातीचा देखील वापर करू शकता.

त्यामुळे जर तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो टिकवून ठेवायचा असेल आणि तरुण दिसायचं असेल तर चेहऱ्याला साबण लावणं बंद करा. तसचं घरगुती उपाय हे कायमच फायदेशीर ठरू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com