Business Idea | कमी गुंतवणुकीत मोठं प्रॉफिट, महिलांसाठी व्यवसायाच्या संधी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women can invest by starting their own business from home

आजही काही ठिकाणी महिला पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत.

कमी गुंतवणुकीत मोठं प्रॉफिट, महिलांसाठी व्यवसायाच्या संधी!

आज डिजिटल क्रांतीमुळे जग आपल्या शेजारी आहे, त्याचा फायदा घेऊन घरबसल्या पूर्ण वेळ किंवा थोडा वेळ अनेक व्यवसाय (Business) करता येतात. आणि त्यातून कमाई करणे शक्य होते. असे अनेक व्यवसाय आहेत, ज्या महिला घरातून करु शकतात आणि तिच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतात.

आजही काही ठिकाणी महिला (Women) पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत. पण तरीही काही भागात काही महिलांच्या कलागुणांना म्हणावा तसा वाव मिळालेला नाही. त्यामुळे काही भारतीय स्त्रिया ‘चूल आणि मूल’ यातच अडकून पडलेल्या आहेत. आपल्याकडील महिला उद्योजक इतर देशांशी तुलना करता मागे आहेत. त्याची काही कारणही आहेत. घरबसल्या महिलांना काही व्यवसाय करता येतात. ज्यामुळे आवड जपल्याचे आणि छंद पुरे करण्याचे समाधान त्यांना मिळेल. याप्रकारे असे अनेक व्यवसाय आहेत जे महिला घरबसल्या कमी गुंतवणूक (Investment) करुन व्यवसाय करु शकतात.

हेही वाचा: शिल्पकला ते चित्रकलेतून व्यवसाय

महिलांना घरबसल्या कमी गुंतवणूक करुन करता येणारे व्यवसाय पुढीलप्रमाणे...

कुकिंग क्लासेस:

सर्व भारतीय महिलांना स्वयंपाक बनवायला खूप आवडते. ज्या महिलांना विविध पदार्थ बनविण्याची आवड आहे, त्यांना ही आवड व्यवसायात रुपांतरीत करता येते. मुख्य म्हणजे ही आवड व्यवसाय म्हणून करायची असेल तर त्यासाठी गुंतवणूक अगदी कमी लागते. तुम्ही व्यवसायाची सुरवात छोटे छोटे कुकिंग क्लास घेऊन करु शकता.

फॅशन डिझायनिंग:

अनेक महिलांना शिवणकला शिकायला आवडते. तसे काही महिलांना शिवणकाम येत नसले तरी त्या आकर्षक पद्धतीने कपडे डिझाईन करु शकतात. कपडे आणि दागिने या महिलांच्या आवडीच्या विषयांशी संबंधित हा व्यवसाय आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या छंदाचे रुपांतर व्यवसायात करु शकता. कमी गुंतवणूक करुन तुम्हाला हा व्यवसाय करता येईल.

ब्युटी पार्लर:

ब्युटी पार्लरचा (Beauty parlor) व्यवसाय करणे हा महिलांसाठी चांगला पर्याय असू शकतो. कोणतीही स्री आपल्या घरातून हा व्यवसाय चालवू शकते. हा व्यवसाय सुरू करण्याआधी योग्य प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा: व्हॉट्सअ‍ॅपवरून हॉटेल्स, रेस्टॉरंट, दुकानं आणि व्यवसाय शोधता येणार?

डे केअर सेवा:

सध्या अनेक शहरात डे केअर सेंटर किंवा पाळणाघरे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. काही महिलांना लहान मुलांची आवड असते, त्यांच्यासाठी पाळणाघर किंवा डे केअर हा एक चांगला व्यवसाय ठरु शकतो. घरच्या घरी करता येणारा हा व्यवसाय फायदेशीर ठरु शकतो.

छंद वर्ग:

लहान मुलांसाठी छंदवर्ग चालविणे हा एक चांगला फायदेशीर व्यवसाय आहे. या व्यवसायामध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू बनविणे, रंगकाम, योग, चित्रकला असे अनेक छंदवर्ग तुम्हाला घेता येतील. तुमच्या वेळेनुसार तुम्हाला दिवसभरात कोणत्याही सोयीच्या वेळी हे वर्ग घेता येतात.

ई कॉमर्स वस्तूंची विक्री:

ई कॉमर्स या आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग खूपच जवळ आले आहे. त्यामुळे आता शॉपिंग करण्यासाठी बाहेर जायची गरज नाहीयेय. सध्या घरबसल्या हव्या त्या वस्तू मागविणे सहज सोपे झाले आहे. याचा फायदा ज्यांना घरबसल्या व्यवसाय करायचा आहे, त्याना नक्कीच होऊ शकतो. तुमच्यातील कला किंवा तुम्ही बनविलेल्या वस्तू, पदार्थ घरोघरी जाऊन विकण्यापेक्षा ई कॉमर्सची मदत घेऊन तुम्ही अशी विक्री करु शकता.

मेणबत्ती बनविणे:

आजकाल घर, ऑफिसमध्ये सजावट म्हणूनही आकर्षक विविध रंगांच्या, विविध डिझाईनच्या मेणबत्त्या घरबसल्या बनवू शकता. असा मेणबत्त्यांना जास्त मागणी आहे, या कल्पना इंटरनेटवरुनही मिळू शकतात. तसेच मेणबत्तीसाठी लागणारा कच्चा माल सहज उपलब्ध होतो. त्यामुळे कमी गुंतवणूक करुन तुम्हाला हा व्यवसाय करता येईल.

हेही वाचा: शुन्यातून उभारी घेत सुरू केला क्रेनचा व्यवसाय

ज्वेलरी:

आजच्या तरुणी आणि महिला वर्गांना फॅशन आणि स्टाईल याबाबत मोठ्या प्रमाणावर आवड निर्माण झालीय. त्यामुळे ज्वेलरी मेकिंग हा घरी बसून काही उद्योग करण्याची इच्छा असलेल्या महिलांना चांगला पर्याय ठरु शकतो. यासाठी फॅशन ट्रेंड्स, ज्वेलरींची आवड असणे आवश्यक आहे.

फ्रीलान्सिंग:

तुमच्याकडे लेखन कौशल्य असेल तर तुम्ही घरातूनही पैसे कमवू शकता. तुम्ही एका मासिक, वर्तमानपत्रासाठी घरी बसून लेख लिहू शकता. बरीच मासिके आणि वर्तमानपत्रे नागरिक पत्रकार प्रवर्गातील सामान्य लोकांना त्यांच्यासाठी लेख लिहिण्याची संधी देतात.

ऑनलाइन बुकिंग:

आपल्याला जर कॉम्प्युटर हाताळता येत असेल व इंटरनेट ची माहिती असेल तर आपण घरबसल्या ऑनलाइन रेल्वे, बस किंवा विमान टिकिट बुकिंगचा व्यवसाय करू शकता.

म्युझिक क्लासेस:

ज्या महिलांना संगीताचे ज्ञान आहे, ते आपल्या घरातून इतर महिलांना किंवा मुलांना संगीत प्रशिक्षण देणे देखील सुरू करू शकतात.

हेही वाचा: स्वत:चा व्यवसाय सुरू करायचाय? कमी गुंतवणूकीत भरघोस कमाईची संधी

इव्हेंट प्लॅनिंग:

आपल्याला इव्हेंट प्लॅनिंग करणे आवडत असल्यास तुम्ही घरातून तुमचा इव्हेंट प्लॅनिंगचा व्यवसाय सुरू करू शकता आणि एक उत्कृष्ट इव्हेंट प्लॅनर बनू शकता.

घरगुती खानावळ:

जर आपल्याला चांगले अन्न कसे बनवायचे हे माहित असेल तर आपण घरगुती डबा विक्रीचा व्यवसाय देखील करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता नाही. फक्त आपल्या हाताला चव असणे गरजेचे आहे.

मेहंदी:

ज्या महिलांना मेहंदी काढता येते त्या महिला आपल्या घरातून मेहंदी काढण्याचा व्यवसाय करू शकतात.सणासुदीला अशा मेहंदी काढणार्‍या महिलांना जास्त मागणी असते.

हेही वाचा: बाटलीत चक्क 'ती' हवा भरून महिलेनं कमावले लाखो रुपये; अजब व्यवसाय बेतला जिवावर

या आठ सरकारी योजना करतात महिलांना उद्योगासाठी आर्थिक मदत

- अन्नपुर्णा योजना

- मुद्रा योजना

- स्त्री शक्ती पॅकेज

- भारतीय महिला बँक उद्योग कर्ज

- महिला उद्यम निधी योजना

- सेंट कल्याणी योजना

- देना शक्ती योजना

- ओरिएंट महिला विकास योजना

Web Title: Women Can Invest By Starting Their Own Business From Home

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top