बाइक असो किंवा स्कूटर मेंटेनन्सचा सोपा मंत्र

bike
bike

बाइक असो किंवा स्कूटर; ती व्यवस्थित मेंटेन करणं आवश्यक असतं. मेंटेन करण्याचे काही सोपे कानमंत्र आपण गेल्या आठवड्यात बघितले. बाइक स्वच्छ ठेवणं, टायरचं प्रेशर योग्य राखणं, चेन टाइट आहे की नाही, हे बघणं आणि नियमित सर्व्हिसिंग करणं, हे कानमंत्र आपण बघितले. आता आणखी काही कानमंत्र बघूया. 

लाइट्स तपासणं 
आपण बाइक चालवतो, तेव्हा आपल्याला बहुतेक वेळा फक्त पुढच्या लाइटचा प्रकाश दिसतो. हा लाइट चालू असणं अतिशय महत्त्वाचं. तुम्हाला रस्ता व्यवस्थित दिसावा यासाठी तो गरजेचा आहेच; पण अंधारात दुसरी गाडी तुमच्या गाडीवर धडकू नये यासाठीही तो आवश्यक आहे. याचबरोबर गाडी वळवताना लागतात, त्या इंडिकेटरचे दिवे, मागे असलेला टेल लँप हेही व्यवस्थित चालत आहेत का ते बघा. इंडिकेटरचे दिवेच बंद असतील, तर तुम्ही बटण दाबून काहीच फायदा होणार नाही. टेल लँपसुद्धा सुरक्षिततेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे हे सगळे दिवे चालू अवस्थेतच हवेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हील अलाइनमेंट 
गाड्यांच्या व्हील्सची अलाइनमेंट फार महत्त्वाची. एखाद्या धक्क्यामुळे किंवा चाक नीट बसवलं नसेल, तर ही अलाइनमेंट बदलते. त्यामुळे विशेषतः बाइक वळवताना ती स्लिप होण्याची भीती असते. खूप वेगात असलात, तर योग्य अलाइनमेंटच्या अभावी अपघातही होऊ शकतात. त्यामुळे हे अलाइनमेंट सर्व्हिसिंगच्या वेळी नक्की करून घ्या. व्यवस्थित बाइक चालवणाऱ्याला अलाइनमेंट नीट नाही ते अंदाजानं लक्षात येतं. तशी शंका आली, तर लगेच अलाइनमेंट करून घ्या. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गाडीचे ब्रेक्स उत्तम हवेत 
कोणत्याही गाडीचं आरोग्य ठरतं ते तिच्या ब्रेक्सच्या आरोग्यावरून. ब्रेक हा अतिशय महत्त्वाचा भाग. अनेकदा ब्रेक नीट लागत नसतानाही तुम्ही दुसऱ्या ब्रेकच्या साह्यानं किंवा तुमच्या ड्रायव्हिंग स्किल्सचा उपयोग करून वेळ मारून नेता; पण ही गोष्ट अतिशय चुकीची. ब्रेक्स हे सदोदित योग्य कंडिशनमध्येच हवेत. ब्रेकचं ऑइलिंग, ब्रेक कांड्या या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. मागचा ब्रेक नीट चालत नसला, तर अनेक जण पुढच्या ब्रेकचा वापर करतात. ही गोष्ट अतिशय चुकीची. 

टायरचा दर्जा 
बाइकचे टायर विशिष्ट काळानंतर खराब होतात. ते गुळगुळीत झाले, तर गाडी स्लिप होण्याची भीती असते. त्यामुळे मेकॅनिकच्या सल्ल्यानं ते योग्य वेळी बदलून घ्या. ट्युबलेस टायर हे जास्त टिकतात आणि त्यांचा मेंटेनन्सही कमी असतो. त्यामुळे असेच टायर शक्यतो बसवून घ्या. टायर बदलण्याचा आळस नंतर घातक होऊ शकतो. टायर चांगले, नसतील तर मायलेजवरही परिणाम होतो.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com