गॅजेट्स : सस्ता है पर सही है

Mobile
Mobile

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सात-आठ महिने लॉकडाउन असल्याने अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. सर्वसामान्य नागरिकांच्या खरेदीक्षमतेवरही त्याचा परिणाम झाला. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा किफायतशीर दरात नवे मोबाईल बाजारात आले आहेच. जाणून घेऊया या नव्या मोबाइल्सविषयी...

नोकिया 2.4
मोबाईल बाजारपेठेत कधीकाळी अग्रगण्य असलेली नोकिया आता नव्याने कात टाकत स्पर्धेत उतरली आहे. ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी असलेल्या या मोबाईलमध्ये ६.५ इंची फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ४५०० एमएएच बॅटरी क्षमतेमुळे हा मोबाईल दोन दिवस स्टॅंडबाय मोडवर चालणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ई-कॉमर्स संकेतस्थळावर या मोबाईलची किंमत १०३९९ पासून सुरू होते.

रेडमी ९ पॉवर
रेडमीने आपला बजेट स्मार्टफोन रेडमी ९ पॉवर भारतात लाँच केला आहे. या मोबाईलमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप असून, वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे. अवघ्या १०९९९ रुपयांमध्ये ६००० एमएएच बॅटरीक्षमता असलेला हा मोबाईल नक्कीच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा दावा कंपनीने केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इन्फिनिक्स झिरो 8 आय
किफायतशीर दरात उत्तमोत्तम मोबाईल देणाऱ्या इन्फिनिक्सने आता आणखी एक नवा मोबाईल बाजारात आणला आहे. ८ जीबी रॅम, १२८ जीबी मेमरी आणि ४५०० एमएएच बॅटरी आणि ४८ मेगापिक्सलमुळे हा मोबाईल अधिक चर्चेत आहे. या मोबाईलची किंमत आहे सुमारे १४९९९ रुपये.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com