फुल्ल चार्ज केली की 420 किमी सुस्साट; नव्या ZS EV मध्ये जबरदस्त फीचर्स

elctrical vehicle
elctrical vehicle

मुंबई - सध्या अनेक वाहन निर्मिती कंपन्या इलेक्ट्रिक व्हेइकलकडे वळल्या आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने आणि इंधनाचे दर या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक  व्हेइकल्स फायद्याची ठरणार आहेत. आता एमजी मोटर इंडियाने जबरदस्त अशी ईव्ही लाँच केली आहे. एकदा चार्जिंग केल्यानंतर ही गाडी तब्बल 419 किलोमीटर धावेल असा दावा कंपनीने केला आहे. 

नवी झेडएस ईव्ही 2021 मध्ये सर्वोत्तम अशी 44.5 kWh हाय टेक बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यावर गाडी 419 किमी धावते. नव्या 215/55/आर17 टायर्ससह सुसज्ज वाहन आणि बॅटरी पॅक ग्राऊंड क्लीअरन्स अनुक्रमे 177 मिमी व 205 मिमी एवढा आहे.  देशभरात चार्जिंग इकोसिस्टिमचा विस्तार करत झेडएस ईव्ही 2021 ही आता 31 शहरांमध्ये बुकिंगसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. जानेवारी 2020 मध्ये सुरुवातीला ही कार 5 शहरांमध्ये लाँच करण्यात आली होती.

एमजी झेडएस ईव्ही ही 143 पीएस पॉवर आणि 350 एनएम टॉर्सह येते. याशिवाय 0 ते 100 kmph वेग 8.5 सेकंदात घेते. एक्साइट व एक्सक्लुझिव्ह अशा दोन प्रकारात ही कार उपलब्ध आहे. भारतातील पहिली शुद्ध इलेक्ट्रिक इंटरनेट एसयुव्ही असून त्यात अनेक नावीन्यपूर्ण सुविधा आहेत. यामध्ये पॅनोरमिक सनरुफ, 17 इंच डायमंड कट अॅलॉयव्हील्स आणि 2.5 पीएम फिल्टर इत्यादींचा समावेश आहे.

झेडएस ईव्ही सोबत  कंपनीने ग्राहकांना 5- वे चार्जिंग इकोसिस्टिम दिली असून घर किंवा ऑफिसमध्ये मोफत एसी फास्ट चार्जर, पोर्टेबल इन-कार चार्जिंग केबल, डीलरशिपसाठी डीसी सुपरफास्ट चार्जिंग स्टेशन, 24x7 चार्ज-ऑन-द-गो सुविधा (5 शहरांमध्ये) व सॅटेलाइट शहर तसेच पर्यटन केंद्रांमध्ये चार्जिंग स्टेशन आहेत.  नवी झेडएस ईव्ही 2021 ही 20 लाख ९९ हजार रुपये इतक्या किंमतीत उपलब्ध होणार आहे.

कंपनीच्यावतीने असं सांगण्यात आलं आहे की,“ एक वर्षापेक्षा कमी कालावधीत झेडएस ईव्ही ही कार लाँच केली आहे. याद्वारे इलेक्ट्रॉनिक वाहनांबद्दल आम्ही कटिबद्ध असल्याचं पुन्हा सांगत आहोत.  तसंच ग्राहकांना जबरदस्त असा अनुभव मिळावा यासाठी आमच्या इकोसिस्टिम पार्टनर्ससोबत आम्ही चार्जिंग सुविधा उभ्या करत आहोत.”

‘इको ट्री चॅलेंज’ 

कंपनीने या चॅलेंजमध्ये झेडएस ईव्ही घेतलेल्यांना या पर्यावरणीय उपक्रमात सहभागी होता येईल. याद्वारे त्यांची CO2 सेव्हिंग आणि रिअल टाइममध्ये राष्ट्रीय क्रमवारी तपासू शकतात. एमजी झेडएस ईव्ही 2021 ही एमजी ईशील्ड सोबत संरक्षित असून, याद्वारे कंपनी 8 वर्षांसाठी अमर्याद किमी करिता 5 वर्षांची मोफत वॉरंटी/1.5 लाख किमी वॉटंरी बॅटरीपॅक सिस्टिमसाठी, 5 वर्षांसाठी राउंड-द-क्लॉक रोडसाइड असिस्टन्स  आणि ५ लेबर-फ्री सर्व्हिसेस दिल्या जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com