esakal | मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त क्रीडा स्पर्धेचे आयोजन
sakal

बोलून बातमी शोधा

मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त क्रीडा स्पर्धेचे आयोजन

मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त क्रीडा स्पर्धेचे आयोजन

sakal_logo
By
टीम YIN युवा

पुणे : मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रीय मंडळ येथील जेजे हॉकी अकॅडमी यांनी क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

हेही वाचा: शिवसेना खासदार भावना गवळींच्या पाच संस्थांवर ED चा छापा

स्पर्धेचे मुख्य उद्घाटक विंग कमांडर एक्स इंडियन एअर फोर्स फायटर पायलट महेश खैरनार तसेच महाराष्ट्रीय मंडळाचे कार्यवाहक श्री रोहन दामले, शैलेश जी आपटे पुणे महानगर क्रीडा भारती अध्यक्ष, श्री विजय जी राजपूत क्रीडा भारती महानगर मंत्री तसेच याबरोबर एडविन जॉन महाराष्ट्र प्रशिक्षक नरेश शेलार आदी यावेळी उपस्थित होते. हा कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी जयेश जंगम महाराष्ट्रीय मंडळ जे जे हॉकी अकॅडमी प्रशिक्षक व सर्व खेळाडू यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा: जर ठाण्यात रोखलं, तर दादरमध्ये दहीहंडी साजरी करु - संदीप देशपांडे

हा कार्यक्रम AEGIS ऑफ हॉकी इंडिया व हॉकी महाराष्ट्र अंतर्गत एक्स लन्सी हॉकी अकॅडमीच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र मंडळ मुकुंद नगर येथील क्रीडांगणावर जे जे हॉकी अकॅडमीच्या परिश्रमाने कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात महिलांची दहा संघ तसेच पुरुषांची सोळा संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये महिला ओपन गटामध्ये प्रथम क्रमांक किड्स इलेव्हन हॉकी अकॅडमी तर द्वितीय क्रमांक सेंट अँड ज्युनियर क्लब व पुरुष ओपन गटामध्ये प्रथम क्रमांक इन्कम टॅक्स तर ग्रीन मेडोज यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

loading image
go to top