HBX - Tata ची नवी मायक्रो SUV कार; असतील खास फीचर्स

टीम ई सकाळ
Wednesday, 30 December 2020

देशातील सर्वात मोठी वाहन निर्मिती करणारी कंपनी टाटा मोटर्स त्यांची नवीन मायक्रो एसयुव्ही बाजारात लाँच करण्याची तयारी करत आहे.

नवी दिल्ली -  देशातील सर्वात मोठी वाहन निर्मिती करणारी कंपनी टाटा मोटर्स त्यांची नवीन मायक्रो एसयुव्ही बाजारात लाँच करण्याची तयारी करत आहे. नव्या मायक्रो एसयुव्हीचं कोडनेम एचबीएक्स असल्याचं म्हटलं जात आहे. नुकतंच या लहान एसयुव्हीचं टेस्टिंग करण्यात आलं आहे. नव्या टाटा एचबीएक्सला पुढच्या वर्षी बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

टाटा एचबीएक्समध्ये रेडि ड्युअल टोन अलॉय व्हील असणार आहेत. या कारची कन्सेप्ट ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आली होती. टेस्टिंग मॉडेल पाहता कंपनी याला टॉल आणि मस्क्युलर डिझाइन देण्याची शक्यता आहे. याशिवाय स्प्लिट हेडलॅम्पसह टाइम रनिंग लाइटही देण्यात आले आहेत. अशा लाइट Harrier मध्येही आहेत. 

हे वाचा - इलेक्ट्रिक कार आणि चार्जिंग

नवीन टाटा एचबीएक्स आकाराने लहान असेल. लांबी 3,840mm, उंची 1,822mm आणि यात 2,450mm चा व्हीलबेस असणार आहे.  आकाराच्या बाबतीत लांबी मायक्रो एसयुव्हीइतकी तर व्हीलबेस मारुती स्विफ्टएवढी आहे. एचबीएक्सला टाटाच्या इम्पॅक्ट 2.0 डिझाइन लँग्वेजवर तयार करण्यात आलं आहे. यामध्ये harrier SUV च्या डिझाइनची झलक दिसून येते. 

कंपनी टाटा एचबीएक्समध्ये 1.2 लीटर क्षमतेचं 3 सिलिंडर असलेलं Revotron पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे. यात 85hp क्षमता आणि 113 Nm टॉर्क जनरेट होतो. याच्या फ्रंटला बम्परच्या खाली मेन क्लस्टरसह एक स्प्लिट हेडलॅम्प सेट देण्यात आला आहे.  यात ह्युमॅनिटी लाइन फ्रंट ग्रिलचा वापर करण्यात आला आहे. एचबीएक्सच्या मागच्या भागात एक मेन क्रीज आहे. यामुळे टेलगेट वेगवेगळ्या भागात विभागले जाते. 

हे वाचा - झूम... : बाइक की स्कूटर?

सध्या या एसयुव्हीला एचबीएक्स कोडनेमने ओळखलं जात आहे. सप्टेंबरमध्ये कंपनीने Timero नावाने एक ट्रेडमार्क रजिस्टर केला होता. त्यामुळे हेच नाव गाडीला दिलं जाण्याची शक्यता आहे. किंमतीबाबत अद्याप काही सांगणं कठीण आहे. मात्र अंदाजे ही मायक्रो एसयुव्ही 5 लाख रुपयांपर्यंत बाजारात येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tata new micro suv car hbx may soon launch